• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लेझर तंत्रज्ञानाचा चमत्कार! जळगावच्या ‘महादेव हॉस्पिटल’मध्ये अत्याधुनिक RIRS शस्त्रक्रिया यशस्वी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 13, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
लेझर तंत्रज्ञानाचा चमत्कार! जळगावच्या ‘महादेव हॉस्पिटल’मध्ये अत्याधुनिक RIRS शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव, (प्रतिनिधी) : महादेव हॉस्पिटल, जळगाव येथे मूत्रविज्ञान (युरोलॉजी) क्षेत्रात लेझर तंत्रज्ञानाच्या सहायाने चिर न देता मूतखडयावर मात करण्यासाठी अत्याधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करत फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी  विथ लेझर पल्व्हरायझेशन ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वीरित्या पार पडली.

चोपडा येथील ५० वर्षीय महिलेच्या उजव्या मूत्रपिंडामध्ये खडा असल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर महादेव हॉस्पिटलमध्ये राईट आरआयआरएस ( रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी) विथ लेझर पल्व्हरायझेशन ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. आरआयआरएस म्हणजे रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी, ही मूत्रपिंडातील खडे काढण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक व कमी त्रासदायक शस्त्रक्रिया आहे.

या पद्धतीत कोणतीही चीर न देता लवचिक युरेटेरोस्कोपच्या साहाय्याने मूत्रमार्गातून मूत्रपिंडापर्यंत पोहोचून लेझरच्या मदतीने खड्याचे बारीक तुकडे केले जातात. त्यामुळे रुग्णाला कमी वेदना होतात, रक्तस्राव कमी होतो व लवकर बरे होण्यास मदत होते.महादेव हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून रुग्णाला मोठा दिलासा दिला आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी कार्यरत असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूमध्ये प्रा. व विभागप्रमुख डॉ. हेमंत केळकर, प्रा. डॉ. हर्षद चौहान, डॉ. शुभम चौधरी आणि डॉ. श्रीकांत रेड्डी यांचा समावेश होता. भूलतज्ज्ञांच्या चमूमध्ये प्रा. डॉ. रघुनाथ बराटे आणि डॉ. ननिता चौधरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.अत्याधुनिक फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी व लेझर तंत्रज्ञानामुळे आता मूत्रपिंडातील खड्यांवर सुरक्षित, प्रभावी आणि जलद उपचार उपलब्ध झाले आहेत. रुग्णाची प्रकृती समाधानकारक असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.

▪️या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे महादेव हॉस्पिटलने प्रगत आणि कमीत कमी चिरफाडीतून होणार्‍या उपचारांच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मूत्रपिंडातील व मूत्रमार्गातील खडे काढण्यासाठी वापरण्यात येणारी ही आधुनिक पद्धत रुग्णांसाठी अधिक सुरक्षित, कमी वेदनादायी आणि जलद पुनर्वसन करणारी मानली जाते. लेझरच्या सहाय्याने खड्यांचे सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर करून त्यांचे प्रभावीरीत्या निर्मूलन करण्यात येते.
– डॉ. हेमंत केळकर


 

Next Post
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘पंचकर्म उपचार सेवा’ सुरू!

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात 'पंचकर्म उपचार सेवा' सुरू!

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add