• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर अत्याधुनिक ‘लेझर’ उपचार; महात्मा फुले व आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत सेवा!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 12, 2026
in आरोग्य
0
महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर अत्याधुनिक ‘लेझर’ उपचार; महात्मा फुले व आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत सेवा!

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी ओळखल्या जाणार्‍या महादेव हॉस्पिटल, जळगाव येथे मुतखड्यावरील उपचारांसाठी अत्याधुनिक रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी  व फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी लेझर प्रणाली रूग्णांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. या अत्याधुनिक लेझर मशिनचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विभागप्रमुख डॉ. हेमंत केळकर, प्रा. डॉ. हर्षद चौहान, डॉ. शुभम चौधरी, डॉ. श्रीकांत रेड्डी, प्रा. डॉ. रघुनाथ बराटे आणि डॉ. ननिता चौधरी आदी उपस्थीत होते. यावेळी बोलतांना प्रसिध्द युरोलॉजीस्ट डॉ. हेमंत केळकर यांनी मूत्रपिंड व मूत्रमार्गातील खड्यांवर शस्त्रक्रियेशिवाय किंवा अत्यल्प चिरफाड करून उपचार करण्यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी मानली जाते. लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खड्यांचे सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर करून ते सुरक्षितपणे बाहेर काढले जातात. त्यामुळे रुग्णाला कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी कालावधीचा रुग्णालयातील मुक्काम आणि जलद पुनर्वसनाचा लाभ मिळतो.

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी महादेव हॉस्पिटलमध्ये या अत्याधुनिक उपचारांचा लाभ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होणार आहे असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महादेव हॉस्पिटलच्या आधुनिक आरोग्यसेवा उपक्रमांचे कौतुक करत, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी अशा सुविधा मोठा दिलासा ठरणार असल्याचे सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि रुग्णकेंद्री सेवा यामुळे महादेव हॉस्पिटल जळगावच्या आरोग्यसेवेत नवा आदर्श निर्माण करीत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Next Post
मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई

मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add