• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

हायड्रोसेफॅलसवरील तज्ज्ञ न्युरोसर्जनकडून शस्त्रक्रिया यशस्वी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 30, 2026
in Uncategorized, आरोग्य, जळगाव जिल्हा
0
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

जळगाव, प्रतिनिधी : अवघ्या चार महिन्यांचे बाळ, सततचे रडणे, अस्वस्थता आणि झटक्यांमुळे चिंतेत पडलेले पालक… अशा परिस्थितीत योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांमुळे जळगाव जिल्हयातील बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

बाळाला मागील १५ दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास होत होता. त्यासोबतच बाळ सतत रडत होते, अस्वस्थ राहत होते आणि त्याला झटके येत होते. अवघ्या चार महिन्यांच्या बाळामध्ये अशी लक्षणे दिसल्याने पालकांची चिंता वाढली. त्यानंतर बाळाला उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आवश्यक वैद्यकीय तपासण्यांनंतर बाळाला हायड्रोसेफॅलस असल्याचे निदान झाले. हायड्रोसेफॅलस म्हणजे मेंदूतील पोकळ्यांमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड या द्रवाचे प्रमाण वाढणे. त्यामुळे मेंदूवरील दाब वाढून लहान बालकांमध्ये सतत रडणे, चिडचिड, उलट्या, डोक्याचा आकार वाढणे आणि झटके येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागाच्या तज्ज्ञ पथकाने बाळावर तझ डॉ. अनिकेत पाटील यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमध्ये मेंदूतील अतिरिक्त द्रव एका विशेष नळीच्या साहाय्याने पोटाच्या पोकळीत सोडला जातो. त्यामुळे मेंदूतील द्रवाचा निचरा होण्यास आणि मेंदूवरील अतिरिक्त दाब नियंत्रित करण्यास मदत होते.अवघ्या चार महिन्यांच्या बालकावर अशी शस्त्रक्रिया करणे हे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत काळजीपूर्वक नियोजन आणि कौशल्याचे काम असते. शस्त्रक्रियेदरम्यान तसेच त्यानंतर बालकाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असते.

शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या पुढील उपचारांची आणि प्रकृतीच्या निरीक्षणाची जबाबदारी बालरोग विभागाने सांभाळली. बाळाचे श्वसन, तापमान, दूध पिण्याची क्षमता, झटक्यांची स्थिती आणि शंटशी संबंधित संभाव्य गुंतागुंत यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात आले. न्यूरोसर्जरी आणि बालरोग विभागाच्या समन्वयातून बाळाला आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
एकाच छताखाली प्रगत उपचार सुविधा

– डॉ. अनिकेत पाटील

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात न्यूरोसर्जरी, बालरोग विभाग, नवजात शिशू अतिदक्षता विभाग आणि बाल अतिदक्षता विभाग यांच्या माध्यमातून बालकांच्या गंभीर आजारांवर आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध आहेत.लहान बालकांमध्ये सतत रडणे, असामान्य चिडचिड, वारंवार उलट्या किंवा झटके अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


 

Next Post
प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

ताज्या बातम्या

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन
जळगाव जिल्हा

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

October 30, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
Uncategorized

अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

October 30, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

नशिराबादजवळ डंपर व ट्रकची भीषण धडक; ट्रकचालकाचा मृत्यू, महामार्ग तीन तास ठप्प

October 30, 2026
कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!
खान्देश

कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!

October 30, 2026
‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ प्रभाग १२ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी
जळगाव जिल्हा

‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ प्रभाग १२ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी

October 30, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या
जळगाव जिल्हा

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या

October 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add