• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 12, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई

​पारोळा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळखेड येथील मारोती मंदिरातून मूर्तीचा चांदीचा मुकुट आणि कानातील चांदीची मासळी चोरणाऱ्या संशयित आरोपीला पारोळा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

​याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक ८ जून २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पिंपळखेड मारोती मंदिर उत्रड शिवार (ता. पारोळा) येथे एका अनोळखी इसमाने दर्शनाच्या बहाण्याने प्रवेश केला. काही वेळ मंदिरात थांबून तो निघून गेला. त्यानंतर मंदिराचे पुजारी आसाराम त्र्यंबक पाटील (रा. बहादरपूर, ता. पारोळा) हे मंदिर बंद करून झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी, ९ जून रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुजारी हे मंदिराची साफसफाई करत असताना, त्यांना मारोती मूर्तीवरील ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट (किंमत रु. ५०,०००/-) आणि कानातील १५० ग्रॅम वजनाची चांदीची मासळी (किंमत रु. १५,०००/-) गायब असल्याचे दिसून आले.

​मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात येताच पुजारी आसाराम पाटील यांनी पारोळा पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तपासादरम्यान पोलिसांनी मंदिरातील व परिसरातील सीटीटीव्ही फुटेज प्राप्त केले. गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हिरापूर (ता. पारोळा) येथील संशयित हिरालाल अरुण पाटील याला ताब्यात घेतले.

​पोलिसांनी संशयित हिरालाल पाटील याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने ८ जूनच्या रात्री पिंपळखेड मारोती मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या हिरापूर येथील घरातून चोरीला गेलेला ६५ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास साळुंखे करत आहेत.

​सदरची यशस्वी कामगिरी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अमळनेर भागाचे एसडीपीओ विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश महाजन, पोहेकॉ कैलास साळुंखे, संदिप अशोक सातपुते, पोकॉ अजय बाविस्कर, आकाश माळी, सुनिल पाटील, अभिजीत पाटील, गिरिश सोनवणे आणि अनिल राठोड यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरात कौतुक होत आहे.

Tags: CrimePolice
Next Post
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add