• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

ब्रेन हॅमरेजवरील आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी; न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांचे यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 29, 2026
in आरोग्य, खान्देश, जळगाव जिल्हा
0
मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

जळगाव, प्रतिनिधी : वय ८३ वर्षे, अपघातात डोक्याला गंभीर दुखापत आणि मेंदूत रक्तस्राव अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत असलेल्या वृद्धाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांच्या उपचारांमुळे नवजीवन मिळाले. ब्रेन हॅमरेजवरील आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर दशरथ हे पुन्हा स्वतःच्या पायावर चालू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दशरथ हे स्वच्छतागृहात गेले असताना अचानक तोल जाऊन पडले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने प्रकृती गंभीर झाली. ते बेशुद्धावस्थेत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील आणि डॉ. विपुल राठोड यांनी तपासणी सुरू केली.

रुग्णाच्या मेंदूची सीटी स्कॅन तपासणी केली असता, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. तसेच शरीराच्या एका बाजूच्या हात-पायांची ताकद कमी झाल्याचेही आढळले. मेंदूतील रक्तस्राव आणि बिघडलेली न्यूरोलॉजिकल स्थिती पाहता परिस्थिती गंभीर होती. वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

वृद्ध रुग्णाचे वय लक्षात घेता शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. शस्त्रक्रियेपूर्वीची तयारी, भूल, शस्त्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी आणि त्यानंतरची देखभाल या सर्व बाबी महत्त्वाच्या होत्या. मात्र, रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. विपुल राठोड आणि डॉ. अदिती जोशी यांच्या वैद्यकीय पथकाने आवश्यक खबरदारी घेत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. काही दिवसांच्या उपचारांनंतर दशरथ पुन्हा स्वतःच्या पायावर चालू लागले. गंभीर ब्रेन हॅमरेजवर मात करून त्यांनी चालण्यास सुरुवात केल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

वृद्ध व्यक्ती पडल्यामुळे डोक्याला मार लागल्यास ती बाब गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. बाहेरून मोठी जखम दिसत नसली, तरी मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला असू शकतो. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, उलट्या होणे, बोलण्यात अडचण येणे किंवा हात-पायांची ताकद कमी होणे ही धोक्याची लक्षणे आहेत. अशा वेळी वेळ न दवडता रुग्णालयात दाखल करून सीटी स्कॅनसारख्या आवश्यक तपासण्या करणे गरजेचे आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास गंभीर परिस्थितीतही रुग्ण बरा होण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांनी सांगितले.


 

Next Post
जळगावात २० डिसेंबरला ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’

जळगावात २० डिसेंबरला ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’

ताज्या बातम्या

जळगावच्या तीन पैलवानांची नेपाळमधील आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड
क्रिडा

जळगावच्या तीन पैलवानांची नेपाळमधील आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड

October 29, 2026
जळगावात २० डिसेंबरला ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’
क्रिडा

जळगावात २० डिसेंबरला ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’

October 29, 2026
मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!
आरोग्य

मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

October 29, 2026
भुसावळ तालुक्यात अवैध दारूविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; १० गुन्हे दाखल
गुन्हे

भुसावळ तालुक्यात अवैध दारूविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; १० गुन्हे दाखल

October 29, 2026
निमखेडी येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर
आरोग्य

निमखेडी येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

October 29, 2026
दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई
खान्देश

दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई

October 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add