• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 12, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या ह.भ.प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे यावल तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, जेष्ठ नेत्ररोग तज्ञ वैद्यकिय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांच्या मार्गदर्शनानुसार या मोहिमेअंतर्गत १० जून रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाचे समन्वयन डॉ. नि. तु. पाटील यांची प्रमुख उपस्थीती होती.

यावल तालुक्यातील गाडर्‍या, जामन्या आणि उसमली या तीन गावांमध्ये मोतीबिंदू तसेच कान-नाक-घसा तज्ञांची टीम उपस्थीत होती. यावल तालुक्यातील २४ टप्प्यांमध्ये विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरांमध्ये नेत्र विभागासोबतच इतर विविध विभागांतील रुग्णांचीही तपासणी केली जाणार असून आवश्यकतेनुसार आरोग्य मार्गदर्शन व उपचार दिले जाणार आहेत. तपासणीत मोतीबिंदू अथवा इतर नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अभियान विशेष लाभदायी ठरणार आहे. एकूण ६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १६ रुग्णांना पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रेफर करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान नागरिकांना डोळ्यांचे आरोग्य, मोतीबिंदूची लक्षणे, वेळेवर उपचारांचे महत्त्व तसेच कान-नाक-घसा विकारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने अशा शिबिरांचे विशेष महत्त्व असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. वैष्णव, डॉ. गौरव, डॉ. दर्शनी आणि डॉ. मुग्धा यांनी विशेष प्रयत्न केले. स्थानिक ग्रामस्थांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानत भविष्यातही अशी शिबिरे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. दि १२ रोजी मानपूर,मालोद,वाघझिरा आणि नायगाव तर १५ रोजी मोहराळे, हरिपुरा,वद्रि तर १७ रोजी धुलेपाडा, कालाडोह, हिंगोणा आणि १९ रोजी डांभुर्णी, कोळन्हावी, डोणगाव या ठीकाणी तंज्ञाची टीम पोहचणार आहे. ५ ऑगस्ट रोजी अकलुद,भालोद आणि अट्रावल येथे शिबिराचा समरोप केला जाणार आहे.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्यसेवा पोहोचविणे ही संस्थेची सामाजिक बांधिलकी आहे. तपासणीपासून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देत यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे.


 

Next Post
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add