जळगाव, दि. २६ – तालुका काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेस भादली येथे भव्य रेशनकार्ड शिबीराचे आयोजन मुरली सपकाळे यांच्या पुढाकारान करण्यात आले. यामध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, नाव वाढवणे, नाव कमी करणे, बारा अंकी नंबर करणे, दुय्यम रेशनकार्ड काढणे ही सर्व कामे या शिबिराच्या माध्यमातून सर्व सामन्य जनतेला लाभ मिळणार आहे. दरम्यान शिबिराच्या माध्यमातून ७०० लोकांनी लाभ घेतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सद्या राज्यात सत्तांतराचे वारे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सुरू केले आहे. त्यामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार व पालकमंत्री गुलाबराव पाटील पद व पैशांच्या लालसेपोटी पळून गेले. परंतु त्याच वेळी काँग्रेस पक्ष रस्तावर उतरून फरार बंडखोर आमदाराच्या मतदार संघात रेशनकार्ड शिबिराच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम करीत असल्याचे वक्तव्य युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केले.
शिबिराप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, मुरली सपकाळे, सरपंच मिलिंद चौधरी, सदस्य अंजली ताई, संदीप कोळी उपस्थित होते. दरम्यान शिबिरासाठी वसीम पटेल, किशोर कोळी, इजाज पटेल, दीपक कोळी, नाना कोळी आदींनी परिश्रम घेतले.