• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?

वाढदिवसानिमित्त राजकीय कारकिर्दीविषयी शुभाशीर्वाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 28, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?

जळगाव (हेमंत पाटील) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांचा आज वाढदिवस. मात्र, यंदाचा हा वाढदिवस केवळ शुभेच्छांचा वर्षाव ठरणार नसून, त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर असून, त्यांना उमेदवारीचे ‘बर्थडे गिफ्ट’ मिळणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्रताप पाटील यांनी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. केवळ ‘मंत्र्यांचा मुलगा’ ही ओळख मर्यादित न ठेवता, त्यांनी ग्रामीण भागात स्वतःचे स्वतंत्र वलय निर्माण केले आहे. मतदारसंघातील लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचा थेट संवाद असतो. कार्यकर्त्याच्या घरातील आनंद असो वा दुःख, प्रताप पाटील तिथे हजर असतातच. हीच ‘आपुलकी’ त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण ठरली आहे.

आरोग्य सेवा आणि तरुणाईची साथ..
संकटकाळात किंवा वैद्यकीय मदतीची गरज असताना प्रताप पाटील धावून जातात. आरोग्य सेवेतील त्यांच्या विशेष योगदानामुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळाला आहे. तसेच आक्रमक कार्यशैली आणि संयमी स्वभाव यामुळे तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. जिल्ह्यातील युवा वर्गाचे संघटन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

जागेचा पेच आणि ‘फिक्स’ उमेदवारीची चर्चा..
सध्या विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीमध्ये खलबतं सुरू आहेत. या जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा केला असला तरी, पक्षश्रेष्ठींच्या चर्चेअंती ही जागा शिवसेना (शिंदे गट) कडे गेल्यास प्रताप पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील पकड पाहता, ते निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार म्हणून ओळखले जातात.

“प्रतापराव केवळ तरुण तडफदार नेते नाहीत, तर ते कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.


 

Tags: #elections#gulabraopatil#political#pratapraopatilJalgaon
Next Post
भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाखांची सोन्याची पोत चोरणारी महिला जेरबंद!

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाखांची सोन्याची पोत चोरणारी महिला जेरबंद!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add