जळगाव, दि. २७ – शहर काँग्रेस कमिटी व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे व महानगर अध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने विरोधात सोमवारी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
अग्नीपथ योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी ४६ हजार पदे भरण्याची ही अग्निपथ योजना आहे. म्हणजेच ही अग्निपथ योजना रोगापेक्षा इलाजच भयंकर असु शकते. योजना विवादास्पद असून मोठ्या जोखमीचे आहे. तसेच वर्षानुवर्षांपासून सैन्यदलातील परंपरा छेद देणारी असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी व्यक्त केले.
अग्नीपथ योजनेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात तीव्र प्रमाणात विरोध होत आहे. जळगाव जिल्हा युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून अग्निपथ योजना तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवक काँग्रेस महानगर अध्यक्ष मुजीब पटेल, सरचिटणीस प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, दीपक सोनवणे, सुधीर पाटील, विशाल पवार, सखाराम मोरे, अमजद पठाण, राहुल भालेराव, रवींद्र चौधरी, अनिल राठोड, सतीश चव्हाण, राजेश पवार, सागर चव्हाण, समाधान राठोड, आकाश नाईक, रवी नाईक आदी उपस्थित होते.