• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 28, 2026
in जळगाव जिल्हा
0
श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव, (प्रतिनिधी) : श्री महावीर सहकारी बँक लि. च्या नवीपेठमधील मुख्यालयात रिक्त झालेल्या संचालकपदासाठी २६ एप्रिल ला पोटनिवडणूक घेण्यात आली. श्री महावीर सहकारी बँकच्या संचालक मंडळातील उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख यांचे निधन झाल्यामुळे व श्वेता चोरडिया यांनी पदत्याग केल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगावचे सहाय्यक निबंधक डी. व्ही. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पाहिले. सभेचा कोरम पुर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम पत्रिकानुसार नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आले.

नानासाहेब देशमुख यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सर्वसाधारण मतदार गटातुन स्वरूपकुमार भागचंद लुंकड व महिला मतदार गटातुन रंजना जितेंद्र देशमुख यांचे एकमेव नामांकन अर्ज प्राप्त झाले. अध्यासी अधिकारी डी. व्ही. पाटील यांनी दोघं जागांसाठी एकमेव वैध नामनिर्देशन पत्र असल्याने स्वरूपकुमार भागचंद लुंकड व रंजना जितेंद्र देशमुख यांची अविरोध निवड झाल्याचे घोषीत केले. या निवडीबद्दल बँकेचे अध्यक्ष दलीचंद हस्तीमल जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, बँकेचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र मयूर, माजी महापौर प्रदीप रायसोनी, जेडीसीसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र नानासाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी बॅंकेचे अध्यक्ष दलिचंद जैन, सुभाष लोढा, अशोक खिवसरा, जितेंद्र कोठारी, गुणवंत टोंगळे, रविंद्र गुजराथी, शांतीलाल बिनायक्या, अजय राखेचा, श्रेयस कुमट, सागर पगारिया, भास्कर कोळी, आर. जे. पवार, कल्याणी नागुलकर, दीपिका चांदोरकर आदी संचालक व सीईओ मनोहर पाटील उपस्थित होते. यावेळी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांनी मनोगत व्यक्त करुन संधी दिल्याबद्दल दलिचंदजी जैन, सुरेशदादा जैन, अशोक जैन व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. पोट निवडणूक प्रक्रिये संबंधित मोलाचे मार्गदर्शन केल्याने डी. व्ही. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार बँकेतर्फे अध्यक्ष दलीचंदजी जैन यांनी मानले.

ग्राहकांशी संवाद महत्त्वाचा- दलिचंद जैन
नवनियुक्त संचालकांनी बँकेच्या सर्व शाखांमध्ये नियमित भेटी द्याव्यात. कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधून ग्राहकांना जास्तीत जास्त सेवासुविधा देता येतील यासाठी नवकल्पना सुचवाव्यात, ग्राहक व बँकेच्या हिताचा समन्वय वाढवूून बँकेच्या उत्कर्ष साधावा, असे मोलाचे मार्गदर्शन दलिचंद जैन यांनी यावेळी केले.

 


 

Next Post
शहरातील वीज समस्यांबाबत उपमहापौर आक्रमक; विनापरवाना पोल उभारल्यास खैर नाही!

शहरातील वीज समस्यांबाबत उपमहापौर आक्रमक; विनापरवाना पोल उभारल्यास खैर नाही!

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add