जळगाव, दि. १७ – युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सोमवारी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाला सदीच्छा भेट दिली. यावेळी श्री. तांबे यांनी वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील सुविधांची माहिती घेत संस्थेच्या कार्याचे कौतुकही केले.
तसेच कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्याशीही त्यांची चर्चा केली. यावेळी युवक कॉंग्रेसचे नुतन जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांचा सत्यजीत तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील उपस्थित होते.