• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने पटकविले विजेतेपद

क्रिकेट स्पर्धेमध्ये संघ ठरला उपविजेता

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 18, 2022
in क्रिडा
0
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने पटकविले विजेतेपद

जळगाव, दि. १८ – अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरीयल वैद्यकीय महाविद्यालात आयोजीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या टिमने दमदार कामगिरी केली. व्हॉलीबॉल या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकविले तर क्रिकेट या स्पर्धेत उपविजेतपद पटकविले आहे. खेळाडुंच्या या यशाचे महाविद्यालयाच्यावतीने कौतुक करण्यात आले.

ओडेसी २०२२ अंतर्गत अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरीयल वैद्यकीय महाविद्यालात दि. १० ते १८ मे या कालावधीत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघानेही क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी स्वतंत्र टिम मैदानात उतरविल्या होत्या.

व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघात कर्णधार विनायक पाटील, उपकर्णधार चेतन पाटील, श्रीवेद निकम, कुणाल नाईक, आशुतोष मगर, देवेंद्र भगत, रोहीत भोसले, आशुतोष शेळके यांचा समावेश होता. व्हॉलीबॉल संघाने चमकदार कामगिरी करीत प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकवुन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. व्हॉलीबॉल संघाला ट्रॉफी आणि रोख रकमेचे पारितोषिक मिळाले.

तसेच क्रिकेट स्पर्धेमध्ये डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्णधार वैभव देशमुख, उपकर्णधार सत्यम काळे, कुणाल नाईक, आशुतोष तिवारी, माधव मुरका, संजोग काळे, बिपीन सातळकर, शुभम जोगदंड, शैलेश शेटे, यश महाजन, चेतन पाटील, रोहीत भोसले, ओम तिडके, ललीत सोनार यांनी सहभाग घेतला. क्रिकेट या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद पटकविले.

या सर्व खेळाडूंना प्रा. रितेश तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यशस्वी खेळाडुंचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्वीकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.


Next Post
निवृत्त अधिकाऱ्यांनाच का, माजी महापौर-उपमहापौर यांनाही सेवेत घ्यावे.. – नगरसेवक प्रशांत नाईक

निवृत्त अधिकाऱ्यांनाच का, माजी महापौर-उपमहापौर यांनाही सेवेत घ्यावे.. - नगरसेवक प्रशांत नाईक

ताज्या बातम्या

वादळी वाऱ्याने झोपडीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, ४ जखमी
जळगाव जिल्हा

वादळी वाऱ्याने झोपडीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, ४ जखमी

June 13, 2025
तलवारीने दहशत माजवणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
गुन्हे

तलवारीने दहशत माजवणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

June 13, 2025
वादळी पाऊस: चाळीसगावमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान, आ. मंगेश चव्हाण यांची पाहणी
कृषी

वादळी पाऊस: चाळीसगावमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान, आ. मंगेश चव्हाण यांची पाहणी

June 13, 2025
धक्कादायक: जळगावमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरी आत्महत्या
जळगाव जिल्हा

धक्कादायक: जळगावमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरी आत्महत्या

June 12, 2025
कजगाव रेल्वे स्थानकावर बडनेरा-नाशिकरोड गाडीला अखेर थांबा
जळगाव जिल्हा

कजगाव रेल्वे स्थानकावर बडनेरा-नाशिकरोड गाडीला अखेर थांबा

June 12, 2025
शेतकऱ्यांच्या १० वर्षांच्या लढ्याला यश! महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती
जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांच्या १० वर्षांच्या लढ्याला यश! महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती

June 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group