• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

रायसोनी नगर आणि पिंप्राळा परिसरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 9, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याचा, तर १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही प्रकरणांत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पहिली घटना रायसोनी नगर परिसरात घडली. येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणारा अल्पवयीन मुलगा ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान अचानक बेपत्ता झाला. अज्ञात व्यक्तीने त्याला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, दुसरी घटना पिंप्राळा परिसरात घडली. येथील १९ वर्षीय तरुणी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली. तिचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ७ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांमधील बेपत्ता मुलगा आणि तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


 

Next Post
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

ताज्या बातम्या

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा
जळगाव जिल्हा

जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा

November 22, 2026
सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट
खान्देश

सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

November 22, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या
जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या

November 22, 2026
जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

November 22, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप
कृषी

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add