• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव विधान परिषद निवडणूक: महायुतीचे नंदकिशोर महाजन ५७७ मतांनी विजयी!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 22, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव विधान परिषद निवडणूक: महायुतीचे नंदकिशोर महाजन ५७७ मतांनी विजयी!

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी ५७७ मतांचा विक्रमी टप्पा गाठत दणदणीत विजय संपादन केला आहे. जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखविलेली अभूतपूर्व एकजूट, प्रभावी संघटनशक्ती आणि लोकप्रतिनिधींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा विजय ऐतिहासिक ठरला असून, जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात यामुळे नवा अध्याय लिहिला गेला आहे.

​या निवडणुकीत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी संपूर्ण प्रक्रियेचे थेट नेतृत्व केले. त्यांनी महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र ठेवत समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच बरोबर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मंत्री ना. संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. अमोल जावळे, आ.किशोर पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे आणि आ. चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकदिलाने काम करत विजयासाठी भक्कम वातावरण निर्माण केले.

​निवडणुकीच्या या रणधुमाळीत जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज पाटील, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी परिश्रम घेतले. संपूर्ण निवडणूक कालावधीत झालेल्या नियोजनबद्ध बैठका, समन्वय मेळावे आणि मतदार संपर्क अभियानामुळे महायुतीची ताकद तळागाळापर्यंत पोहोचली.

​हा निकाल म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासाभिमुख शासनव्यवस्थेवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेला थेट विश्वास मानला जात आहे. राज्य शासनाच्या विविध विकासकामांना आणि लोककल्याणकारी योजनांना मिळालेल्या भक्कम पाठिंब्याचे प्रतिबिंबच या निकालातून समोर आले आहे.

​नंदकिशोर महाजन यांना मिळालेली विक्रमी ५७७ मते ही केवळ विजयाची आकडेवारी नसून, महायुतीच्या नेतृत्वावर आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांवर मतदारांनी टाकलेली जनविश्वासाची पावती असल्याचे बोलले जात आहे. या घवघवीत विजयामुळे आगामी काळातही जळगाव जिल्ह्यात विकास आणि जनसेवेची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

​


 

Tags: #jalgaondistrict#politicalAmalnerBjp
Next Post
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत कुणाला किती मते मिळाली पहा!

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत कुणाला किती मते मिळाली पहा!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add