• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

नंदूभाऊ महाजन : जनमानसात रुजलेलं अभ्यासू नेतृत्व, विधानपरिषदेसाठी सज्ज!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 16, 2026
in राजकीय
0
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

नंदूभाऊ महाजन : जनमानसात रुजलेलं अभ्यासू नेतृत्व, विधानपरिषदेसाठी सज्ज!

जळगाव, (प्रतिनिधी) : आजच्या बदलत्या राजकीय पटलावर सत्तेसाठी वारंवार भूमिका आणि पक्ष बदलणारे नेते जळगाव जिल्ह्याने पाहिले आहेत. अशा अस्थिर राजकीय वातावरणात सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत असताना, आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून एकच पक्ष आणि एकच झेंडा सोबत ठेवणारे प्रामाणिक नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते. विधानपरिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, यंदाची लढाई महायुतीच्या भक्कम साथीने सोपी झाली असल्याचे चित्र आहे. तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा ‘आमदार’ पदाचा बहुमान नंदूभाऊ महाजन यांच्या रूपाने मिळणार असल्याच्या चर्चेवर आता जळगाव जिल्ह्यात शिक्कामोर्तब होत आहे.

स्पष्टवक्तेपणा आणि माणुसकीची जपणूक..
आजच्या राजकारणात शब्द आणि कृती यात मोठी दरी पाहायला मिळते. मात्र, नंदूभाऊ महाजन याला अपवाद आहेत. जे मनात तेच ओठावर, हा त्यांचा स्वभाव असून जनतेच्या प्रश्नांवर किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी बोलताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. निवडणुकीच्या काळात अनेकदा समाजात जातीपातीचे राजकारण केले जाते. परंतु, नंदूभाऊंनी आपल्या सार्वजनिक जीवनात कधीही जाती-पातीच्या चौकटी स्वीकारल्या नाहीत. त्यांच्या मते, ‘माणुसकी’ हाच एकमेव धर्म आणि ‘माणूस’ हीच एकमेव जात आहे.

शेतकरी समाजासाठी आशेचा नवा किरण..
नंदूभाऊ महाजन यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करताना संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण विकासाची कास धरली. त्यांच्या जिल्हा परिषद व जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या कार्यकाळात सर्व सहकारी सदस्यांचे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी राहिले. तापी, पूर्णा आणि गिरणाकाठच्या शेतकरी समाजासाठी ते आता आशेचा नवा किरण ठरत आहेत. मतदारसंघामध्ये आमदारकीसाठीजी कोणी नेता नव्हे, तर एक कुटुंबप्रमुखच निवडणूक लढवत असल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे.

महायुतीची भक्कम साथ; विक्रमी विजयाचा विश्वास..
जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या नगरसेवक व नगराध्यक्षांना जनतेचा प्रचंड कौल मिळाला असल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित ताकद उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. गेल्या २५ वर्षांतील त्यांची सर्वसमावेशक छबी ही त्यांची जमेची बाजू आहे.

▪️”पक्ष दोन नव्हे चार डोळ्यांनी पाहत असतो, हे नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर मांडलेले निरीक्षण तंतोतंत खरे आहे. महायुतीतील सर्व मतदार-लोकप्रतिनिधी आपली पक्षनिष्ठा व महायुतीचा धर्म नक्की निभावतील आणि हा विजय ऐतिहासिक असेल.”
-चंद्रकांत बाविस्कर (जिल्हाध्यक्ष, भाजपा)

पहिल्यांदाच खरा शेतकरी विधानपरिषदेची पायरी चढणार!..
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत व्यापारी किंवा बड्या नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तीलाच आमदारकीची संधी मिळत आल्याचा इतिहास आहे. मात्र, विधानपरिषद हे कायदे करणारे वरिष्ठ सभागृह असल्याने तिथे अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व जाणे गरजेचे आहे.
यंदा नंदूभाऊंच्या रूपाने खऱ्या अर्थाने जमिनीशी जोडलेला शेतकरी आणि ग्रामीण-नागरी प्रश्नांची उत्तम जाण असणारा लोकनेता सभागृहात पोहोचणार असल्याने, जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावी आवाज मिळेल, असा ठाम विश्वास जिल्हाभरातून व्यक्त केला जात आहे.


 

Tags: #politicalBjpजळगाव
Next Post
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या प्रवासातून आत्मनिर्भर आणि सुरक्षित भारताचा उदय; विकासासोबतच वारशाचेही संवर्धन

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या प्रवासातून आत्मनिर्भर आणि सुरक्षित भारताचा उदय; विकासासोबतच वारशाचेही संवर्धन

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add