• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 7, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

जळगाव, (प्रतिनिधी) : वेळेवर निदान आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे अपघातग्रस्त शेतकर्‍याचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील शंकर महाजन (वय ५५), हे जळगाव तालुक्यातील शेतकरी शेतातून घरी परतत असताना बैलगाडीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसून ते बेशुद्ध अवस्थेत गेले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी त्यांची तात्काळ प्राथमिक तपासणी केली. डॉक्टरांनी तातडीने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. सीटी स्कॅन अहवालात मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीला वैद्यकीय भाषेत एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा असे म्हणतात, जी जीवघेणी ठरू शकते. रक्ताची गाठ मेंदूवर दाब निर्माण करत असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ. विपूल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मयूर बर्‍हाटे, डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. प्रितम दास, डॉ. शार्दुल, डॉ. कोमेश नेमाडे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे, डॉ. मारीया यांच्या टीमने ‘क्रेनीओटोमी’ ही जटिल शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. ही शस्त्रक्रिया दीड ते दोन तास चालली. शस्त्रक्रियेच्या दरम्यान डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने मेंदूमधील रक्ताची गाठ काढून टाकली आणि रक्तस्त्राव थांबवण्यात यश मिळवले.

हळूहळू रुग्णाची प्रकृती सुधारू लागली. काही दिवसांच्या उपचारानंतर शंकर महाजन यांना शुद्ध आली आणि त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.

▪️अपघातानंतर एका तासाच्या आत म्हणजेच गोल्डन अवर्समध्ये हा रूग्ण आल्यानंतर तातडीने सीटी स्कॅन करून निदान केले असता एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा ही गंभीर अवस्था आढळून आली असली तरी वेळेवर शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य होते. या प्रकरणात रुग्णाला वेळेत उपचार मिळाल्यामुळेच त्यांचे जीवन वाचवता आले.योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य यामुळे शंकर महाजन यांना नवजीवन मिळाले आहे.
-डॉ. श्रृती खंडागळे, डॉ.उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
एस.टी. आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या कामाचा हिशोब द्या; गोर सेनेचे राज्यभर आंदोलन

एस.टी. आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या कामाचा हिशोब द्या; गोर सेनेचे राज्यभर आंदोलन

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add