• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना

भगवान बुद्धांचे विचार शांतता व करुणेचा मार्ग दाखवणारे : डॉ. उल्हास पाटील

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 2, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मुलींच्या वस्तीगृहात भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

​कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील आणि मूर्तीच्या विशेष पूजनाने करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर ‘बुद्धं शरणं गच्छामि’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. भगवान बुद्धांचे शांतता, करुणा आणि ज्ञानाचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले.

​या सोहळ्याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विशाखा गणवीर, डॉ. पियुष वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, वस्तीगृह अधीक्षक हर्षा कोल्हे, संकेत पाटील, शिवानंद बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

​केवळ मूर्ती प्रतिष्ठापना न करता, यावेळी विद्यार्थिनींसाठी विशेष ‘ध्यान सत्र’ आणि ‘शांतता संदेश’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित महंतांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजात सद्विचार, मानवता आणि शांततेचे महत्त्व अधोरेखित केले. वस्तीगृहातील विद्यार्थिनींना अभ्यासासोबतच मानसिक शांतता मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

Next Post
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

ताज्या बातम्या

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add