• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 26, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

​जळगाव, (प्रतिनिधी) : रामटेक येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगाव शहराचा नामवंत पैलवान सौरभ पवार याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल त्याला मानाची अडीच (२.५) किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. या घवघवीत यशामुळे जळगाव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​रामटेक येथील ‘परमात्मा एक बहुद्देशीय तालीम संघ’ आणि ‘श्री बळवंत वस्ताद व्यायाम शाळा’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुपर मार्केट परिसरामध्ये या प्रेक्षणीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज आणि नामांकित पैलवानांनी सहभाग घेतला होता. उपस्थित हजारो कुस्ती शौकिनांच्या साक्षीने हे चुरशीचे सामने पार पडले. या सर्व मातब्बर मल्लांवर मात करत जळगावच्या सौरभ पवारने अंतिम लढतीत उत्कृष्ट डावांचे प्रदर्शन करत विजय मिळवला आणि मानाच्या गदेवर आपले नाव कोरले.

​या भव्य कुस्ती स्पर्धेला कार्यक्रमाचे उद्घाटक रामटेक विधानसभेचे आमदार आशिष जयस्वाल यांच्यासह परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि कुस्ती क्षेत्रातील वस्ताद मंडळी उपस्थित होती. स्पर्धेचे नेटके सूत्रसंचालन आणि यशस्वी नियोजन तुषार सुभाश यादव यांनी केले. सौरभच्या या यशाबद्दल क्रीडा जगतातून आणि जळगावकरांकडून त्याचा विशेष सत्कार व अभिनंदन करण्यात येत आहे.
पैलवान सौरभ राजेश पवार यांचा मोबाइल क्रमांक: ९५९५३७१७१३


 

Tags: #sports
Next Post
बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध

बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
जळगाव जिल्हा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

November 25, 2026
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला

November 25, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 25, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add