• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतीच्या वादातून कन्नडच्या व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; गोणीत मृतदेह भरून बहुळा नदीत फेकला

एलसीबीकडून थरारक हत्याकांडाचा उलगडा, दोघांच्या मुसक्या आवळल्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 24, 2026
in Uncategorized
0
शेतीच्या वादातून कन्नडच्या व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; गोणीत मृतदेह भरून बहुळा नदीत फेकला

जळगाव / पाचोरा, प्रतिनिधी : शेतीच्या व्यवहारासाठी आलेल्या कन्नड येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्यांचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे उघडकीस आली आहे. डोक्यात लोखंडी पाईपचे वार करून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चक्क गोणीत भरून बहुळा नदीत फेकून देण्यात आला होता. मात्र, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने तपासाची चक्रे फिरवत या ‘ब्लाईंड’ हत्याकांडाचा छडा लावला असून, दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संजय धनराज तेली (वय ५०, रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे दुर्दैवी मृत व्यक्तीचे नाव आहे.

१८ नोव्हेंबर २०२६ रोजी संजय तेली हे शेतीच्या व्यवहारासाठी गोराडखेडा (ता. पाचोरा) येथे आले होते. मात्र, ते बेपत्ता झाल्याने अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या मित्राने पाचोरा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवला गेला. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले.

एलसीबीच्या पथकाने गोराडखेडा परिसरात गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय केले. विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित राहुल धर्मा पाटील (वय ४५) आणि संजय वामन भिल्ल (वय ५५, दोघे रा. गोराडखेडा) यांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच संपूर्ण हत्याकांडाचा थरार समोर आला.

मुख्य आरोपी राहुल पाटील याचा मयत संजय तेली यांच्यासोबत शेतीचा वाद होता. याच वादातून त्याने लोखंडी पाईपने संजय तेली यांच्या डोक्यात जबर प्रहार करून त्यांचा जागीच खून केला. त्यानंतर कृत्य लपवण्यासाठी सहकारी संजय भिल्ल याच्या मदतीने मृतदेह एका गोणीत कोंबला आणि बहुळा नदीच्या पात्रात फेकून दिला. आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी नदीत शोधमोहीम राबवून मृतदेह हस्तगत केला. याप्रकरणी खुनासह पुरावा नष्ट केल्याच्या कलमांची (१०३(१), २३८, १४०(२), ३(५), ३१५) वाढ करण्यात आली असून, पुढील तपास पाचोरा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप शेवाळे करत आहेत.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, पोकॉ जितेंद्र पाटील, रतन गिते, ईश्वर पाटील, भूषण पाटील, चालक पोहेकॉ बाबासाहेब पाटील तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप शेवाळे आणि पोहेकॉ दिलीप वाघमोडे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला.

 


 

ताज्या बातम्या

शेतीच्या वादातून कन्नडच्या व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; गोणीत मृतदेह भरून बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून कन्नडच्या व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; गोणीत मृतदेह भरून बहुळा नदीत फेकला

November 24, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 24, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; वर्षभरात दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगणार
जळगाव जिल्हा

बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; वर्षभरात दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगणार

November 24, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

November 24, 2026
व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल
गुन्हे

व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add