• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 26, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

जळगाव, (प्रतिनिधी) : ​रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत दोन सराईत दुचाकी चोरांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल अर्जुन महाजन (वय ४२, रा. कुंभा, ता. रावेर) हे २३ जून २०२६ रोजी दुपारी रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालय येथे एका लग्न समारंभासाठी आले होते. लग्न आटोपल्यानंतर ते आपली काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक MH-19-DT-7111) घेण्यासाठी गेले असता, त्यांना ती जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रावेर पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, मात्र संशयितांचे चेहरे अस्पष्ट असल्याने ओळख पटण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक मदतीचा वापर करत आरोपींचे फुटेज आणि गाडीचे फोटो विविध गावांतील व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केले. यादरम्यान, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर चोरीची गाडी खानापूर येथील दोन इसमांकडे काही तासांपूर्वी दिसली होती.

​या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने खानापूर येथे जाऊन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेली होंडा युनिकॉर्न गाडी बऱ्हाणपूर रोडवरील हॉटेल काकाजीच्या मागील बाजूस असलेल्या वनराईत लपवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून ती गाडी जप्त केली. तसेच, त्यांच्याकडून आणखी एक विना नंबर प्लेट असलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (चेसिस नंबर- HA10ERGHD23656) हस्तगत करण्यात आली असून, या दुसऱ्या गाडीच्या मालकाचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​याप्रकरणी पोलिसांनी समाधान उर्फ शंभू रमेश जाधव (वय ३३) आणि मनोज भागवत चंदनकर (वय ३९, दोन्ही रा. खानापूर, ता. रावेर, जि. जळगाव) यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत.

​सदर यशस्वी कामगिरी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेकॉ समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेकॉ समाधान ठाकूर करत आहेत.


 

Next Post
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add