• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहरूण तलाव परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 26, 2026
in गुन्हे
0
मेहरूण तलाव परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार पिस्तूलासह अटकेत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : मेहरूण तलाव परिसरातील सुबोनिया पार्क भागात कंबरेला गावठी पिस्तूल लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समीर खान जावेद खान (वय २५, रा. तांबापुरा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

​परिसरात स्वतःचा वचक निर्माण करण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्य करण्याच्या उद्देशाने समीर हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, गणेश ठाकरे, सुभाष साबळे आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन समीरला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी ते पिस्तूल तात्काळ जप्त करून समीरला अटक केली.

​पोलीस कोठडीत असताना तपासाधिकारी विजयसिंग पाटील यांनी समीरची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने हे पिस्तूल जावेद शेख सलीम शेख (रा. दत्तनगर, मेहरूण) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. या माहितीवरून पोलिसांनी लागलीच संशयित पुरवठादार जावेदच्या घरावर छापा टाकला; मात्र पोलीस येण्यापूर्वीच तो फरार झाला. पोलीस सध्या फरार पुरवठादाराचा शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Tags: #midcpoliceCrimeJalgaonPoliceजळगाव
Next Post
रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add