• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 26, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

जळगाव, (प्रतिनिधी) : तीव्र पोटदुखी, पोट फुगणे आणि अनेक दिवस शौचास न होणे अशा गंभीर त्रासामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या ७८ वर्षीय वृद्धाचे प्राण शल्यचिकित्सकांच्या तत्परतेमुळे वाचले. मोठ्या आतड्याला बसलेला धोकादायक पीळ (सिग्मॉइड व्हाल्वुलस) याचे अचूक निदान करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णाला नवजीवन मिळाले.

याबाबत माहिती अशी की, मलकापूर येथील लक्ष्मण पाटील या ७८ वर्षीय रुग्णाला काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. कालांतराने त्यांचे पोट मोठ्या प्रमाणात फुगले आणि शौचास होणे पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी रुग्णाच्या लक्षणांचा सखोल अभ्यास करून तातडीने सीटी स्कॅन करण्यात आला.

या तपासणीत मोठ्या आतड्याच्या सिग्मॉइड भागाला पीळ बसल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय भाषेत या स्थितीला सिग्मॉइड व्हाल्वुलस असे म्हटले जाते. सिग्मॉइड व्हाल्वुलसमध्ये आतडे स्वतःभोवती वळल्याने अन्न, वायू आणि मल यांचा मार्ग पूर्णपणे बंद होतो. उपचारास विलंब झाल्यास आतड्याचा रक्तपुरवठा थांबून आतडे निकामी होण्याचा तसेच जीवाला धोका निर्माण होण्याचा संभव असतो. त्यामुळे निदान होताच शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांच्यासह डॉ. प्रज्योत कदम, डॉ. आदीत्य पाटील यांच्या टीमने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

शस्त्रक्रियेदरम्यान आतड्याला बसलेला पीळ यशस्वीरित्या सोडविण्यात आला. तसेच आतड्याची स्थिती तपासून आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारू लागली असून सध्या ते धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

▪️सिग्मॉइड व्हाल्वुलस ही विशेषतः वृद्धांमध्ये आढळणारी गंभीर समस्या आहे. पोटदुखी, पोट फुगणे, उलट्या होणे किंवा शौचास न होणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. वेळेत सीटी स्कॅनसारख्या तपासण्या केल्यास अचूक निदान होते. आणि योग्य उपचारांमुळे जीवितहानी टाळता येते. या रुग्णाच्या बाबतीतही वेळीच निदान झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले.
– डॉ. प्रज्योत कदम, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय

Next Post
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add