• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 27, 2026
in शैक्षणिक
0
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

​जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या, २८ जून २०२६ रोजी राज्यभरात घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न काही इसमांकडे आधीच उपलब्ध असल्याचे निष्पन्न झाल्याने हा खळबळजनक निर्णय घेण्यात आला आहे.

​परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, २८ जून रोजी महाराष्ट्रातील एकूण १०२८ केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार होती. नुकत्याच झालेल्या NEET २०२६ परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने अत्यंत चोख आणि सुरक्षिततेचे उपाययोजना केल्या होत्या. मात्र, आज २७ जून रोजी पहाटेच्या सुमारास भिवंडी पोलिसांना काही संशयास्पद इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याची गोपनीय टीप मिळाली. पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाड टाकली.

​या कारवाईनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकार्‍यांना पडताळणीसाठी तातडीने पाचारण करण्यात आले. तपासादरम्यान, संबंधित इसमांकडे सापडलेले प्रश्न आणि TET जून २०२६ च्या मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न तंतोतंत समान असल्याचे आढळून आले. या गंभीर प्रकारानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​परीक्षेची संपूर्ण पारदर्शकता कायम राहावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या हेतूने परीक्षा परिषदेने २८ जूनची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. TET परीक्षेच्या पुढील तारखांबाबतची अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.


 

Tags: #exam#tet
Next Post
जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add