• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मैदानावर पत्रकार भिडले! ‘प्रेस फोटोग्राफर’ संघाने कोरले विजेतेपदावर नाव

पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ चा थरार : जळगाव प्रिंट मीडिया उपविजेता, तर प्रेस एडिटर संघ तृतीय

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 31, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
मैदानावर पत्रकार भिडले! ‘प्रेस फोटोग्राफर’ संघाने कोरले विजेतेपदावर नाव

​जळगाव, (प्रतिनिधी) : समाजाच्या प्रश्नांसाठी अहोरात्र धावणाऱ्या पत्रकारांच्या मनगटातील जोर आणि खेळाडूवृत्तीचा प्रत्यय जळगावकरांना नुकताच आला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ‘पत्रकार प्रीमियर लीग’ पर्व-२ च्या अंतिम सामन्यात प्रेस फोटोग्राफर संघाने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत जळगाव प्रिंट मीडिया संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर प्रेस एडिटर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

​२४ संघांचा सहभाग आणि अटीतटीचे सामने..
जळगावच्या सागर पार्क मैदानावर २६ ते २९ मार्च दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील तालुकानिहाय १४ संघ आणि जळगाव शहरातून संपादक, लोकप्रतिनिधी, प्रशासन, डॉक्टर व पोलीस अशा एकूण २४ संघांनी सहभाग नोंदवला होता. या सामन्यांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा उच्चांक पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, एका सामन्यात ९९ धावांची सर्वोच्च धावसंख्या तर एका सामन्यात २० धावांची निचांकी धावसंख्या देखील नोंदवली गेली.

​अधिकारी आणि पत्रकारांच्या मैत्रीपूर्ण लढती..
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी केवळ पत्रकारांमध्येच नाही, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही चुरस पाहायला मिळाली. प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालय संघाने वैद्यकीय महाविद्यालय संघावर मात केली. तर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाच्या संघाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि आयोजन समितीच्या संघांना पराभूत करत मैदान मारले.

​दिमाखदार पारितोषिक वितरण..
स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले होते. तर चार दिवसांच्या या प्रवासात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आ. राजुमामा भोळे, आ. किशोर पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला.

या यशस्वी आयोजनासाठी किशोर पाटील, वाल्मिक जोशी, प्रवीण सपकाळे, चेतन वाणी, जकी अहमद, भगवान सोनार, वसीम खान, सचिन गोसावी, राकेश वाणी, यामिनी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Next Post
सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

July 9, 2026
दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हे

दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 9, 2026
जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ
सामाजिक

जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्हा

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

July 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group