• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 1, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असतानाच, एमआयडीसी पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​कुसुंबा-एअरपोर्ट रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले.

​पोलीस पथकाने २८ मार्च २०२६ रोजी एअरपोर्टजवळील ‘तारा बिझनेस पार्क’ परिसरात सापळा रचला. यावेळी एका दुचाकीवर दोन संशयित तरुण येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. ​झडती घेतली असता, दुचाकी चालकाच्या कमरेला एक गावठी कट्टा आणि खिशात तीन जिवंत काडतुसे मिळून आली.

दरम्यान संशयित दिपक ठकुबा गुंजाळ (वय २८) आणि विठ्ठल रंगनाथ सोनवणे (वय २५) दोघं रा. दुर्गा नगर, सिल्लोड यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल (किंमत २०,००० रुपये), ​०३ जिवंत काडतुसे (किंमत ३,००० रुपये), स्पोर्ट्स बाईक (किंमत १,००,००० रुपये), ​अँड्रॉइड मोबाईल फोन (किंमत १०,००० रुपये) असा एकूण १,३३,००० रुपये किमतीचा मुद्देमाल ​पोलिसांनी हस्तगत केला आहे.

​आरोपींची अधिक चौकशी केली असता, त्यांनी हा कट्टा जळगावमधील तांबापुरा भागातील अजय बिरजु गारुंगे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. अजय गारुंगे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, विशाल कोळी आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने केली. ​या प्रकरणाचा पुढील तपास पोउनि चंद्रकांत धनके व पोकों चेतन पाटील करत आहेत.


 

Tags: #midcpoliceCrimeJalgaonPolice
Next Post
धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!

धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार 'महाविष्णू याग' अन् 'दशावतार मूर्ती' प्राणप्रतिष्ठा सोहळा!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add