• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव मनपा स्थायीवर अनुभवाचा ‘कस’; महायुतीचा दबदबा, १६ सदस्यांची निवड!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव मनपा स्थायीवर अनुभवाचा ‘कस’; महायुतीचा दबदबा, १६ सदस्यांची निवड!

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर, प्रशासकीय कामकाजात अत्यंत कळीच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड सोमवारी (दि.१६ फेब्रुवारी) विशेष महासभेत करण्यात आली. महायुतीने आपले वर्चस्व राखत स्थायी समितीच्या १६ जागांपैकी १५ जागांवर कब्जा मिळवला आहे. पहिल्या वर्षी विकासकामांना गती देण्यासाठी तिन्ही प्रमुख पक्षांनी अनुभवी चेहऱ्यांवर विश्वास दर्शवला आहे.

​महानगरपालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर तातडीने विषय समित्यांच्या निवडीसाठी विशेष महासभा बोलावण्यात आली होती. या सभेच्या व्यासपीठावर महापौर, उपमहापौर यांच्यासह आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि नगरसचिव शुक्ला यांची उपस्थिती होती.

​स्थायी समिती: भाजपचे पारडे जड..
​स्थायी समितीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून बंद पाकिटात नावे सादर करण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांनी या नावांचे वाचन केले. १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे १०, शिवसेनेचे ५ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या १ सदस्याचा समावेश आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्या समितीकडे असतात, त्या स्थायी समितीवर भाजपने आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले आहे.

​महिला व बालकल्याण समिती..
​महिला व बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांचीही यावेळी घोषणा करण्यात आली. यात भाजपचे ५, शिवसेनेचे ३ आणि ठाकरे गटाच्या १ सदस्याची वर्णी लागली आहे. निवडीनंतर सभागृहात सर्व नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

​आता लक्ष सभापती निवडीकडे..
​सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी दोन्ही समित्यांच्या सभापतींची निवड आता विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात होणार आहे. या पदांसाठी कोणाची वर्णी लागते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत पक्ष नेतृत्वाकडून या हालचालींना वेग येणार आहे.

​निवड झालेले सदस्य खालीलप्रमाणे:
​स्थायी समिती सदस्य (१६):
​भाजप: दीपक सूर्यवंशी, नितीन लढ्ढा, विशाल भोळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके.
​शिवसेना: विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, सागर सोनवणे.
​शिवसेना (ठाकरे गट): इब्राहिम पटेल.

​महिला व बालकल्याण समिती सदस्य (९):
​भाजप: सुरेखा नितीन तायडे, रंजना विजय वानखेडे, पूजा विजय जगताप, विद्या मुकुंदा सोनवणे, गायत्री राणे.
​शिवसेना: सिंधु कोल्हे, प्रतिभा देशमुख, डॉ.अमृता सोनवणे.
​शिवसेना (ठाकरे गट): हिनाबी शाकीर खान.


 

Tags: #jalgaon_city#municipalcorporation
Next Post
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व - संजय मारणे

ताज्या बातम्या

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 9, 2026
जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ
सामाजिक

जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्हा

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

July 8, 2026
१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार
आरोग्य

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार

July 7, 2026
निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक
जळगाव जिल्हा

निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक

July 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group