• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

मधमाशी पालन विषयावर जनजागृती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 17, 2026
in कृषी, जळगाव जिल्हा
0
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

जळगाव, (प्रतिनिधी) : शेतीमध्ये परागीभवनासाठी मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले. फळबाग, भाजीपाला व तेलबिया पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी मधमाश्या अत्यंत उपयुक्त ठरतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. असे पुणे येथील संचालक, इंडियन नॅचरल हनीबीज चे संजय मारणे यांनी मधमाश्यांचे विविध प्रकार, त्यांचे उत्पादने (By-products), बी व्हेनम (Bee Venom), परागीभवनाचे महत्त्व तसेच शेतीसाठी मधमाशी पालन कसे उपयुक्त आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधमाशी पालन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी यवतमाळ कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रदीप वादाफळे, अमरावती चे दिगंबर भुयार, नाशिक चे विजय चोंडेकर, सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक पी. टी. पाटील, जामनेरचे प्रगतीशील शेतकरी एस आर पाटील, जैन इरिगेशन कृषी विभागाचे संजय सोन्नजे, एनर्जी पार्क सीएसओ दिपक चौधरी, गांधी रिसर्च फाऊंडेशन सुधीर पाटील, लक्ष्मण देशमुख, जैन इरिगेशन वन वन्यजीव पर्यावरण विभागाचे सल्लागाराचे राजेंद्र राणे उपस्थित होते.

मधमाश्यांचे प्रमुख प्रकार जसे की एपिस सेरेना इंडिका (Apis cerana indica), एपिस मेलिफेरा (Apis mellifera), एपिस डॉर्साटा (Apis dorsata), एपिस फ्लोरिया (Apis florea) तसेच डंखरहित मधमाश्या (Stingless Bees) यांची माहिती देण्यात आली. एपिस डॉर्साटा (Rock Bee) या मोठ्या आकाराच्या मधमाश्या असून त्या उंच झाडे व इमारतींवर उघड्यावर पोळे बांधतात. त्यांचे मध उत्पादन जास्त असते, परंतु त्यांचे नियंत्रित व्यवस्थापन करणे कठीण असते. एपिस फ्लोरिया (Little Bee) या लहान आकाराच्या मधमाश्या असून त्या झुडपांवर किंवा लहान फांद्यांवर पोळे बांधतात. त्यांचे मध उत्पादन कमी असले तरी परागीभवनात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. तसेच मधमाश्यांपासून मिळणारी उपउत्पादने जसे की मध, मेण (Beeswax), परागकण (Pollen), रॉयल जेली, प्रोपोलिस आणि बी व्हेनम (Bee Venom) यांचे औषधी व आर्थिक महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

शेतीमध्ये परागीभवनासाठी मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले. फळबाग, भाजीपाला व तेलबिया पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी मधमाश्या अत्यंत उपयुक्त ठरतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. “No Bees – No Food” ही संकल्पना स्पष्ट करत पर्यावरण संतुलनात मधमाश्यांची भूमिका विशद करण्यात आली.

मधमाशी पालनाची देखभाल (Maintenance), बॉक्स व्यवस्थापन, राणी मधमाशीचे महत्त्व, रोग नियंत्रण, हंगामी काळजी आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालन कसे फायदेशीर ठरते यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ४० सहभागींकडून मधमाशी संरक्षणाची शपथ (Oath) घेण्यात आली. सहभागीनी पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा केली –
“मी मधमाश्यांचे संरक्षण करीन, पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देईन, कीटकनाशकांचा योग्य व मर्यादित वापर करीन आणि ‘No Bees – No Food’ हा संदेश समाजात पोहोचवीन.”
उपस्थितांनी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार राजेंद्र राणे यांनी केले.


 

Tags: #Gandhiresearchfoundation#jainirigation#jalgaon_city
Next Post
प्लास्टिक विरोधात जळगाव महापालिकेचा ‘एल्गार’; १ मार्चनंतर थेट २५ हजारांचा दंड अन् फौजदारी गुन्हे!

प्लास्टिक विरोधात जळगाव महापालिकेचा 'एल्गार'; १ मार्चनंतर थेट २५ हजारांचा दंड अन् फौजदारी गुन्हे!

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add