जळगाव, (प्रतिनिधी) : शिवसेना जळगाव महानगर शाखेतर्फे पक्षाचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सामाजिक आणि विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात शालेय विद्यार्थी मदत, वृक्षारोपण आणि गोशाळेला चारा वाटपासारख्या उपक्रमांचा समावेश होता.
या वर्धापन दिनानिमित्त प्रतिभा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच, राजमालती नगर येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले, ज्यात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत राजमालती नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. याशिवाय, नूतन मराठा महाविद्यालय येथेही शिवसेना सदस्य नोंदणी अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले.
गोसेवेचे महत्त्व अधोरेखित करत पांझरा पोळ गोशाळा येथे जनावरांना चारा आणि कुट्टीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, समन्वयक राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी, उपमहानगरप्रमुख प्रमोद शिंपी, सागर पाटील, युवासेना उप महानगरप्रमुख सनी सोनार, वेदांत पाटील, शिवम सोनवणे, अमर राजपूत, राहुल पाटील, पंकज सोनवणे, नयन चव्हाण, दीपक सोनवणे, धीरज सोनार, दुर्गेश महाजन, निलेश कोळी, रोहित पवार, शिवम कस्तुरे, प्रथमेश पाटील, यश वानखेडे, कल्पेश सोनार, निखिल दहितडक, शुभम शिंदे, विशाल कोळी, मोहित राजपूत, चेतन चौधरी, संदीप पाटील, कल्पेश सोनार, सिद्धेश पाटील, बंटी बनसोडे, बंटी पाटील, धीरज पाटील आदींसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.