• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 19, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील गायत्री नगर येथील राजस्थान मार्बलच्या बाजूला असलेल्या नदलाल मिलकीराम मकडीया यांच्या पत्र्याच्या गोदामातून ३५,००,०००/- रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची (फ्रीज, वॉशिंग मशीन, ए.सी., एल.ई.डी. टी.व्ही.) चोरी झाल्याची घटना १५ जून ते १६ जून २०२५ दरम्यान घडली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा समांतर तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, चोरीचा मुद्देमाल शिरपूर शहरातील करवंद रोडवरील महावीर लॉन्स येथील एका खाजगी पत्र्याच्या गोदामात ठेवल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, पंचांसमक्ष पंचनामा करून एकूण १८,८०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी, ज्या खाजगी गोदामात चोरीचा मुद्देमाल ठेवण्यात आला होता, त्या गोदामाचे मालक १) मुजावर जामील शेख चांद (वय ४८, रा. न्यू बोराडी, ता. शिरपूर ह.मु. गणेश कॉलनी, आर.सी. पटेल उर्दू शाळेजवळ, शिरपूर) आणि २) जफर शेख मुजावर (वय २४, रा. मुजावर मोहल्ला, शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळे) या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग कार्यालयातील पो. हे. कॉ. उमाकांत पाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो. हे. कॉ. विजय नेरकर, पो. हे. कॉ. संदीप धनगर, सचिन चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर अढाळे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, राहुल वानखेडे, जावेद शहा, स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पो. उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सहा. फौजदार रवी नरवाडे, पो. हे. कॉ. गोपाळ गव्हाळे, पो. हे. कॉ. मुरलीधर धरगर, पो. हे. कॉ. संदीप चव्हाण, पो. हे. कॉ. प्रवीण भालेराव, चालक भरत पाटील, तसेच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो. हे. कॉ. महेश चौधरी आणि राहुल भोई यांचा समावेश होता.
सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हे करत आहेत.

VIDEO


Tags: #jalgaon #maharashtraCrime
Next Post
वडील रागावल्याने १६ वर्षीय मुलीची आत्महत्या: जळगावात हळहळ

वडील रागावल्याने १६ वर्षीय मुलीची आत्महत्या: जळगावात हळहळ

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group