• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मद्यपी पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने आवळला गळा; जळगावमधील धक्कादायक घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 7, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मद्यपी पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने आवळला गळा; जळगावमधील धक्कादायक घटना

​जळगाव, (प्रतिनिधी) : दारूच्या नशेत सतत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका ५० वर्षीय महिलेने आपल्या पतीची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे. भरत नामदेव पाटील (वय ५८, रा. केसी पार्क) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी पत्नी मनीषा पाटील हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत भरत पाटील हे व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यांनी दारूसाठी राहते घरही विकले होते आणि ते सतत पत्नी व मुलांना त्रास देत असत. मंगळवारी (५ मे) रात्री १० च्या सुमारास भरत पाटील यांनी पुन्हा दारूच्या नशेत पत्नीशी वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात मनीषा यांनी दोरीने पतीचा गळा आवळून त्यांना पलंगावरून खाली ओढले. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन आणि गळा आवळल्या गेल्याने भरत यांचा मृत्यू झाला.

सुरुवातीला या घटनेची नोंद ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून करण्यात आली होती. मात्र, मृतदेहाच्या गळ्यावरील खुणा पाहून पोलिसांना संशय आला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता, मनीषा पाटील यांनी सततच्या त्रासाला कंटाळून ही हत्या केल्याची कबुली दिली.

​

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात जळगावच्या तरुणाचा मृत्यू

हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात जळगावच्या तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add