• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात जळगावच्या तरुणाचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात जळगावच्या तरुणाचा मृत्यू

​जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील फुपनगरी येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका ४४ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश विठ्ठल मोरे (रा. राजमालती नगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना ५ मे रोजी खेडी फाट्याजवळ घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश मोरे हे फुपनगरी येथे एका नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून रात्रीच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने जळगावकडे परतत होते. खेडी फाट्याजवळील एका वळणावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ज्वारीच्या शेतात जाऊन आदळली.
​
​हा अपघात इतका भीषण होता की, सुरेश मोरे यांना शरीरावर आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
​
​या प्रकरणी मयताचे भाऊ किरण मोरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज पाटील करत आहेत.
​


 

Tags: #jalgaon_cityaccidentJalgaon
Next Post
बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी जळगाव महापालिका सतर्क; उपमहापौरांनी घेतली तातडीची आढावा बैठक

बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी जळगाव महापालिका सतर्क; उपमहापौरांनी घेतली तातडीची आढावा बैठक

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add