• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 6, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्क भागात झालेल्या मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात जळगावच्या एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातील सेंधवा येथील एका आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
​
​तारा बिझनेस पार्क भागातील रहिवासी आणि रुबी कंपनीचे मालक मोईज अब्बाज बोहरा हे १३ एप्रिल रोजी आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले होते. १६ एप्रिलच्या पहाटे जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित आरोपी मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील दुर्गम भागात असल्याची माहिती मिळाली.

​पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील चाचरीया पाटी, सेंधवा परिसरात जाऊन वेशांतर केले आणि अत्यंत कौशल्याने सहा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.

​यात ​१) निलेश उर्फ भुन्या माहेरिया डुडवे, २) ताराचंद पठाण सोलंकी, ३) सायसिंग राकेश सोलंकी, ४) रविंद्र छोटू आर्य, ५) दिलीप मंगा डुडवे, ६) ग्यारशीलाल मगन अलावे (सर्व राहणार: चाचरीया पाटी, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांना अटक केली आहे. दरम्यान त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ११,५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकों प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश ठाकुर, मोतीलाल बोरसे, विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहूल घेटे या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.


 

Tags: #midc#midcpoliceCrimeJalgaonPolice
Next Post
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

ताज्या बातम्या

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add