• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भक्ती संगीत संध्येतून भवरलाल जैन यांच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण

मोठ्याभाऊंच्या श्रद्धावंदन दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 25, 2024
in जळगाव जिल्हा
0
भक्ती संगीत संध्येतून भवरलाल जैन यांच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण

जळगाव, दि.२५ – ‘कर्म हेचि जीवन’ मानणाऱ्या जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन अर्थात मोठेभाऊ यांचा आज ता. २५ फेब्रुवारी श्रद्धावंदन दिन निमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या वतीने ‘भक्ती संगीत संध्येतून मोठ्याभाऊंच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण करण्यात आले.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तनतर्फे आयोजित सहा दिवसीय मैत्र महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता. भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटर मध्ये सुरू असलेल्या या महोत्सवात आज अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी गितार, तबला, बासरी, किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून दादाजींच्या जगण्याचे सार्थकत्व अधोरेखित केले.

याप्रसंगी प्रमूख अतिथी म्हणून अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, ज्योती जैन, स्कूलच्या संचालिका निशा जैन, डाॕ.भावना जैन, सुनिता भंडारी उपस्थित होते. महोत्सव प्रमुख अनिल कांकरिया, स्वरूप लूंकड, पारस राका, नारायण बाविस्कर उपस्थित होते. श्रध्देय भवरलाल जैन यांना श्रध्दांजली अर्पण करून स्वरानुभूतिची सुरूवात झाली. सुत्रसंचालन अनुष्का महाजन, नमित जैन यांनी केले.

तबला सोलोची जुगलबंदी..
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांसाठी दादाजींचं प्रेम मोठ्याभाऊंनी दिलं. त्याच आत्मियेतून अनुभूती निवासी स्कूल च्या विद्यार्थ्यांनी ‘भक्ती संगीत संध्या’ प्रस्तुत केले. तबला वादनामध्ये तीन ताल मध्ये उठान, कायदा, रेला, तुकडा, चक्रधर प्रस्तुत केले. तिन ताल मध्ये ठाठ, आमद, टुकडे आणि लडी सादर केले. यानंतर तीन ताल मध्ये लखनौ घराण्याच्या कथ्थक नृत्याने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘हे राम अच्यूत्तम केशवा..’ ने आनंदाची अनुभूती करून दिली. मोठेभाऊंचे पाणी, माती यासह सृष्टीसंवर्धनाचे कार्याचे स्मरण करत, विठु माऊली तु माऊली जगाची… राधा राणी लागे.. खेळ मांडला.. मोह लागे लगन.. वृक्षवल्ली आम्हां सोयरे.. मिठा क्रिष्णा नाम है.. अशी गीत गायली. औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित व भारतीय संस्कृतीची संस्कारमूल्यं रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलद्वारा संपन्न झालेल्या भक्ती संगीत संध्येला जळगावकरांनी भरभरून दाद दिली. तबला गुरू अमृतेश शांडिलय, गायन गुरू आकाश बिस्वाल, कथ्थक गुरू सोनम शांडिलय यांनी अनुभूतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


 

Next Post
चाळीसगावची नवी ओळख एम एच ५२, जीआर निघाला

चाळीसगावची नवी ओळख एम एच ५२, जीआर निघाला

ताज्या बातम्या

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध
खान्देश

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
गुन्हे

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

August 24, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
गुन्हे

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

August 24, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 24, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
गुन्हे

१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक

August 24, 2026
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add