• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चाळीसगावची नवी ओळख एम एच ५२, जीआर निघाला

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 27, 2024
in जळगाव जिल्हा
0
चाळीसगावची नवी ओळख एम एच ५२, जीआर निघाला

जळगाव, दि.२७ – आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतर चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, त्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित देखील झाला आहे. त्यामुळे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून चाळीसगावची नवी ओळख आता एम एच ५२ अशी असणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील वाहनधारकांना आपल्या वाहनांच्या पासिंग व आरटीओ संदर्भातील कामांसाठी सुमारे १२० किलोमीटर दूर जळगाव येथे ये-जा करावी लागत होती. त्यात पूर्ण दिवस प्रवासात जाऊन नागरिकांचा वेळ व पैसा वाया जात होता. दुर्दैवाने या प्रवासात अनेकांचे अपघात देखील झाले होते.

चाळीसगाव वासीयांच्या भावनांची दखल घेऊन अखेर आमदार मंगेश चव्हाण यांनी शासनाकडे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या त्या पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनाने विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन व परिवहन विभागाचे सर्व अधिकारी वर्ग यांचे आमदार मंगेश चव्हाण आभार मानले आहेत.

▪️चाळीसगाव वासीयांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होणे, हा निर्णय ऐतिहासिक व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा आहे. आपण मला आपल्या सेवेची संधी दिली, त्यामुळेच चाळीसगावच्या हितासाठी काम करता येत आहेत. समस्त चाळीसगाव वासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
– आमदार मंगेश रमेश चव्हाण, चाळीसगाव.

 


Next Post
महासांस्कृतिक महोत्सवाचे जळगावात आयोजन

महासांस्कृतिक महोत्सवाचे जळगावात आयोजन

ताज्या बातम्या

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक
खान्देश

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

June 19, 2025
शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

June 19, 2025
शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
खान्देश

शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 19, 2025
सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन
जळगाव जिल्हा

सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन

June 18, 2025
बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !
जळगाव जिल्हा

बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

June 18, 2025
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group