मुंबई | दि.२६ जुलै २०२४ | महाराष्ट्र शासन दरवर्षी व्यावसायिक नाटकांची अतिशय प्रतिष्ठेची नाट्य स्पर्धा आयोजित करत असते. वर्षभरातील उत्तम व्यवसायिक नाटके या स्पर्धेत भाग घेतात. यात प्राथमिक फेरीतून निवडल्या गेलेल्या दहा नाटकांची अंतिम फेरी होते. या अंतिम फेरीच्या स्पर्धेची सुरुवात दिनांक चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह माटुंगा येथे झाली.
स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक प्रमोद पवार, मंगेश देसाई, शंभू पाटील, रवींद्र पाथरे, मधुरा वेलणकर यांच्या सोबत सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक बिभीषण चवरे हे होते. पहिल्या दिवशी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक सादर करण्यात आले दिनांक २४ ते ३ ऑगस्ट या कालावधीत ही नाट्य स्पर्धा होत आहे.