जळगाव | दि.२३ जुलै २०२४ | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरदचंद्र पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मंगळवारी करण्यात आला.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध करण्यात आला. तसेच जोरदार घोषणा देण्यात आल्या.
पवार साहेब हे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. या दौऱ्याला मतदारांचा व नागरिकांचा प्रतिसाद मिळत असुन भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांच्याकडून असे डोके फिरू वक्तव्य केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, अशोक लाडवांजरी, विकास पवार, रमेश पाटील, मंगला पाटील, उमेश पाटील, रिकु चौधरी, वाल्मीक पाटील, मजहर पठाण, राजू मोरे, डॉ. रिजवान खाटीक, डॉ. संग्रामसिंह सुर्यवंशी, ॲन्ड सचिन पाटील, नामदेव वाघ, किरण राजपूत, अमोल कोल्हे, रहीम ताडवी, चेतन पवार, शैलेश अभंगे, संजय जाधव, रफिक शहा, अयाज शहा,चंद्रकांत चौधरी, गणेश सोनार, मतिन सैय्यद, भल्ला तडवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते.