• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 6, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

जळगाव, (प्रतिनिधी) : वय अवघे १२ वर्षे….हातात पुस्तके असण्याऐवजी मित्रांच्या साथसंगतीमुळे मद्याची बाटलीच आली. मद्यासोबतच गांजाचे सेवन करू लागलेल्या बालकाच्या सवयीमुळे संपुर्ण कुंटुंबच हादरले. अशा परिस्थितीत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या मानसोपचार तज्ञांच्या पुढाकारामुळे १२ वर्षीय बालकाच्या आयुष्यात व्यसनमुक्तीचा आशेचा किरण दिसून आला. रूग्णालयातील औषधोपचार आणि समुपदेशनामुळे प्रकृतीत सुधारणा होऊन बालकाचे मन पुन्हा पुस्तकांकडे वळू लागले आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव परिसरात राहणार्‍या १२ वर्षीय बालक हा शालेय शिक्षण घेतो. शिक्षण घेत असतांना अचानक दुर्गुणांची संगत त्याला भेटली. या संगतीमुळे तो मद्य प्राशन करू लागला. मद्याची झिंग चढत नाही म्हणून त्याने गांजा देखील ओढून पाहीला. त्यानंतर सोल्युशनचाही नशा त्याला जडला. अशा विविध नशायुक्त पदार्थांच्या व्यसनाच्या गर्तेत बुडालेल्या या १२ वर्षीय बालकाचा स्वभाव चिडचिडा झाला. त्याचे दैनंदिन जेवण देखील कमी झाले. त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला.

मुलाच्या या सवयीमुळे संपुर्ण कुटुंबच हादरले. त्याच्या पालकांनी तातडीने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मुलाला उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी डॉ. हुमेद महाडिक, डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. ऋचिता आटे, डॉ. सोनाजी गायके, डॉ. निकिता खाटवानी, डॉ. अभिलाषा राठोड, डॉ. फरीन सुरैय्या, डॉ. रेशल श्रीवास्तव यांच्या टीमने बालकाची तपासणी केली. त्याचा सीटी स्कॅन तपासणीही करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले.

यासोबतच त्याचे समुपदेशनही करण्यात आले. औषधोपचार आणि समुपदेशनामुळे बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तसेच व्यसनांपासून मन वळविण्यासाठी त्याला इतर कलाकृती शिकविण्यात आल्या. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉक्टरांच्या पुढाकारामुळे बालकाच्या जीवनात आशेचा किरण दिसूू लागला आहे.

▪️डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या बालकाला संगतीतील मित्रांमुळे व्यसनाची सवय जडली होती. आजुबाजूला जसे वातावरण असते तसाच प्रभाव आपल्या मनावर पडत असतो. या बालकाच्या बाबतीत असेच दिसून आले. त्यामुळे औषधोपचार आणि समुपदेशन अशा दोन्ही पध्दतींचा उपचारासाठी उपयोग करण्यात आला. त्यामुळे बालकावर करण्यात आलेले उपचार यशस्वी ठरले.
– डॉ. देवांश गणात्रा, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

Next Post
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

खरीप पेरणीची घाई नको; 'अल नीनो'च्या संकटात 'बीबीएफ' तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add