• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावातील शिवतिर्थ मैदानावर श्रीराम कथेचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 19, 2024
in धार्मिक
0
जळगावातील शिवतिर्थ मैदानावर श्रीराम कथेचे आयोजन

जळगाव, दि.१९ – अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त २० ते २४ जानेवारी दरम्यान शहरातील जी.एस. ग्राऊंड (शिवतिर्थ मैदान) येथे चिमुकले राम मंदिराचे पुजारी ह.भ.प. दादा महाराज जोशी यांच्या वाणीतून श्रीराम कथेचे वाचन करण्यात येणार आहे. कथा दुपारी ०१ ते सायंकाळी ०५ या वेळेत राहणार आहे.

राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या प्रेरणेतून जळगाव शहरात सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व आमदार राजूमामा भोळे मित्र परिवार यांच्या वतीने या श्रीराम रामकथेचे आयोजन करण्यात असून कार्यक्रमाची सुरवात २० जानेवारी शनिवार रोजी सकाळी ११.०० वाजता नवीन बस स्टँड समोरील चिमुकले राम मंदिर येथून शोभा यात्रेला सुरवात होऊन, शोभा यात्रेचा समारोप दु. १२:०० जी.एस. ग्राऊंड (शिवतिर्थ) येथे होईल. याच ठिकाणी दुपारी. ०१ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत ह.भ.प. दादा महाराज जोशी यांच्या श्रीराम कथेला सुरवात होईल.

शहरातील सर्व राम भक्त बंधू, भगिनी, महिला भजनी मंडळ, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्यने शोभा यात्रेत व कथेत सहभाग घेऊन व उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समिती, श्रीराम भक्त, शिवमहापुराण समितीच्या वतीने आ. सुरेश भोळे (राजूमामा), नितीन लढ्ढा, राजू बांगर, देवेंद्र अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, अशोक जाजू, यशवंत बारी, नितीन पाटील, अशोक राठी, श्याम जोशी, श्रीनिवास व्यास, संजय व्यास, मनीष बाहेती, मनीष झंवर, रामदयाल सोनी, कांजी सोनी, रामलालजी, मनोज भांडारकर यांनी केले आहे.

Next Post
भाजपच्या ‘मंदिर व तीर्थक्षेत्र स्वच्छता अभियानाला’ मंत्री गिरीश महाजनांची उपस्थिती

भाजपच्या 'मंदिर व तीर्थक्षेत्र स्वच्छता अभियानाला' मंत्री गिरीश महाजनांची उपस्थिती

ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार
धार्मिक

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार

July 10, 2026
सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांचे विशेष हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य

सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांचे विशेष हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर

July 10, 2026
महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांची “लुडबूड” आता चालणार नाही; आयुक्तांनी काढले परिपत्रक
महाराष्ट्र

महापालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांची “लुडबूड” आता चालणार नाही; आयुक्तांनी काढले परिपत्रक

July 10, 2026
भुसावळात सराईत मोटारसायकल चोर गजाआड; ६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश
गुन्हे

भुसावळात सराईत मोटारसायकल चोर गजाआड; ६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश

July 10, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

July 9, 2026
दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हे

दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group