जळगाव, दि. १९ – ‘प्रभू श्रीराम जन्मभूमी’ राम मंदिर अयोध्या २२ जानेवारीला प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला १४ ते २२ जानेवारी दरम्यान ‘मंदिर स्वच्छता अभियान’ राबविण्याचे आवाहन केले आहे. या अनुषंगाने शुक्रवारी शहरातील बालाजी मंदिर बालाजी पेठ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे (राजुमामा), महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, भारती सोनवणे, मंदिर व तीर्थक्षेत्र स्वच्छता अभियानाचे संयोजक माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, सुनील खडके, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, दिपक सुर्यवंशी, प्रकाश बालाणी, राजेंद्र मराठे, अजय गांधी, सरोज पाठक, मुकुंद मेटकर, स्वरूप लिंकड, पिंटू काळे, वीरेण खडके, रेखा पाटील, चित्रा मालपाणी यांच्यासह भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा महानगर, तसेच सर्व माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.