• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौकातील वाहतुक कोंडीसाठी राष्ट्रीय महामार्ग, महापालिका आणि पोलीस विभागाला जिल्हाधिकारी यांचे पत्र

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 27, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौकातील वाहतुक कोंडीसाठी राष्ट्रीय महामार्ग,  महापालिका आणि पोलीस विभागाला जिल्हाधिकारी यांचे पत्र

जळगाव;- शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतुक कोंडी, वारंवार होणारे अपघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्त्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्दावर चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 26 जुलै रोजी विशेष बैठक घेतली. त्यानंतर रस्ता दुरुस्ती संदर्भात प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग,वाहतुक नियमन संदर्भात जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक, रस्त्यातील अतिक्रमण संदर्भात जळगाव महानगरपालिका आयुक्त यांना पत्र लिहून यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सांगितले आहे.

प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग याच्या पत्रात ‘ आकाशवाणी चौक, अजिंठा चौक आणि इच्छादेवी चौक येथे वाहतूक सिग्नल उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. धुळ्याकडून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रंबलरच्या पट्ट्या आणि रिफ्लेक्टरही देण्यात येतील. वरील तिन्ही ठिकाणचे खड्डे तातडीने दुरुस्त करावेत. तसेच या तिन्ही जंक्शनवर यापूर्वी प्रस्तावित केलेल्या उड्डाणपुलांच्या प्रस्तावाची प्रत लवकरात लवकर या कार्यालयात सादर करावी अशा सूचना केल्या आहेत.

महानगरपालिका आयुक्त यांना, ‘ जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली व ईच्छादेवी चौक येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. परिणामी सदर तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात देखील झालेले आहेत. त्याठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. तर जिल्हा पोलीस अधिक्षक यांना, आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली व ईच्छादेवी चौक येथील रहदारी नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याबाबत त्यांच्या स्तरावरुन पुढील कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत.

वाहतुक कोंडी, होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना वेळोवेळी स्मरणपत्र देण्यात आल्याचेही या पत्रात नमूद केले असून याविषयाचे गांभिर्य ओळखून तात्काळ कार्यवाही करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियमित पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाने सांगितले.

Next Post
चोपडा तालुक्यात ११ लाखांचा गांजा पकडला

चोपडा तालुक्यात ११ लाखांचा गांजा पकडला

ताज्या बातम्या

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add