• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

केळी पीक विमा व अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करावी.. – आयुष प्रसाद

शेतकऱ्यांच्या निवेदनांवर जिल्हाधिकाऱ्यांची सुनावणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 1, 2023
in कृषी
0
केळी पीक विमा व अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करावी.. – आयुष प्रसाद

जळगाव, दि.०१- मागील वर्षातील केळी पीक विम्याची व या वर्षातील २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची दक्षता घेण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.

जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त तक्रार अर्जांवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सुनावण्या घेण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया चे जिल्हा प्रतिनिधी राहूल पाटील, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील २०२२-२३ अंतर्गत केळी पिकांचे नुकसान भरपाई बाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून अप्पर मुख्य सचिव (कृषी), मंत्रालय, मुंबई यांच्याकडे पाठपुरावा करून दिवाळीपूर्वी विमा कंपनीने शेतक-यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करावी.

प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत २०२३-२४ साठी जळगाव जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंपनीचे सर्व आक्षेप यापूर्वीच नाशिक विभागीय आयुक्तांनी फेटाळले आहेत‌. तेव्हा २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात यावी. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.


 

Next Post
गोदावरी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला अंंतराळातील इस्रोचा प्रवास

गोदावरी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला अंंतराळातील इस्रोचा प्रवास

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add