जळगाव, दि.०१ – भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणार्या जगातील अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, या संस्थेचे, सन १९६९ मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. इस्रोचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ भरत चनियारा तसेच रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. चंद्रमाऊली जोशी यांनी गोदावरी सीबीएसईत विद्यार्थ्यांना व्याख्यानातून अंतराळ तंत्रज्ञानातील इस्त्रोचा प्रवास उलगडून सांगीतला.
इस्रो हा भारतीय विज्ञानाचा सर्वात मोठा विजय आहे., ही देशाच्या अंतराळ संपत्तीच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळते. कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरू हे भारतातील सर्वात मोठे अंतराळ केंद्र आहे, सध्या अंतराळ संशोधनात सुमारे १७००० व्यक्ती कार्यरत असल्याचे सांगत त्यांनी मुलांना मुख्य केंद्र उपग्रह तंत्रज्ञान, आवाज करणारे रॉकेट, इस्रोचा इतिहास,धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन, उपग्रह कक्षाचे वेगवेगळे प्रकार,उपग्रहाचे प्रकार,नाविक (दिक्चालन यंत्रणा) सॅटेलाईट नेव्हीगेशन सिस्टीम याबद्दल माहिती दिली.
इस्रोचे पहिले मिशन कोण होते हा प्रवास आपल्या व्याख्यानातून उलगडून सांगितला तर रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ.चंद्र माऊली जोशी यांनी मुलांना गणिताबद्दल वेगवेगळ्या पध्दती विषद करून गणित हा विषय कठीण नसून अत्यंत सोपा असल्याचे उदाहरणातूल उलगडून सांगितले. यावेळी इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते.