जामनेर, दि. ०१ – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला समर्थन देत, जामनेर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार पासून शहरातील तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे. समाजाच्या भावनांसोबत न खेळता राज्यातील परिस्थिती ही टोकाला जाणार नाही, याची दक्षता सरकारने घ्यावी. अशा प्रतिक्रिया साखळी उपोषणात सहभागी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी दिलीप खोडपे, राहुल चव्हाण, अतुल सोनवणे, अशोक पाटील, प्रदिप गायके, अमोल ठोबरे, विश्वजित पाटील, प्रकाश पाटील, शंकर मराठे, डॉ. प्रशांत पाटील, प्रदीप पाटील, नरेंद्र जंजाळ, योगेश पाटील, प्रवीण गावंडे, राजू चोपडे, प्रशांत भोंडे, नाना पाटील, जितू पाटील, नरेंद्र धुमाळ, आबासाहेब पाटील, किरण पाटील, विलास चव्हाण, जीवन सपकाळ,पद्माकर पाटील,प्रल्हाद बोरसे,दत्तू साबळे,भूषण कानळजे, मयुर पाटील, दशरथ पाटील, प्रभाकर पाटील, दीपक पाटील, निखिल खंडारे, जितेंद्र पाटील, बंटी पाटील, किशोर पाटील, महेंद्र बाविस्कर, अनिल बोहरा, प्रफुल्ल लोढा, मूलचंद नाईक यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.