• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘बोलवा विठ्ठल’ कार्यक्रमातून पांडुरंगाची अनुभूती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 12, 2022
in जळगाव जिल्हा
0
‘बोलवा विठ्ठल’ कार्यक्रमातून पांडुरंगाची अनुभूती

जळगाव दि.१२ – विठ्ठल रूखमाईंच्या वेशभूषमधील चिमुकल्यांची दिंडी, रिंगण सोहळा, पाऊली,  टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘माझा देव पंढरी…’,’सुंदर ते ध्यान’.. या भक्ती गितांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची आराधना करण्यात आली. ‘बोलवा विठ्ठल’ या कार्यक्रमाने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची अनुभूती जळगावात झाली.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे रविवारी कांताई सभागृह येथे ‘बोलवा विठ्ठल’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.  विवेकानंद कुलकर्णी, सी.ए. विवेक काटदरे, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे प्रसाद भट, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद बुवा, प्रतिष्ठानचे सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते.

‘बोलवा विठ्ठल’ या कार्यक्रमात अनुभूती स्कूल, गोदावरी संगीत महाविद्यालय, शानबाग स्कूल, पलोड शाळा,  विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक दीपिका चांदोरकर यांनी केले. गुरूवंदना वरूण नेवे यांनी सादर केली. तेजल भट यांनी सूत्रसंचालन केले.

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी, रिंगण व खेळ सादर केले. डॉ.अपर्णा भट यांच्या प्रभाकर संगीत कला तर्फे नृत्याची प्रस्तुती करण्यात आली. यावेळी ‘गजर, घनू वाजे,  कानडा राजा पंढरीचा, अनुभूती गणे, कोण्या गावी हो, माझा देव पंढरी, संतांची या गावी, खेळ मांडियेला, वेढा वेढा रे पंढरी, सुंदर ते ध्यान, चल ग सखे, रखुमाई रखुमाई अनुभूती, धाव घाली आई, विष्णू मय जग, अवघा रंग एक झाला, चंद्रभागेच्या तीरी, अवघे गरजे पंढरपूर’ अशी एकाहूनएक सरस भक्तीगितांची मैफल रंगली. भक्तिगीतांच्या मैफिलीतून साक्षात पंढरपूर अनुभूती रसिकांना झाली. तबला संगत प्रसन्न भुरे, सोहम कुलकर्णी तर हार्मोनियम साथ शौनक दीक्षित याने केली.

Next Post
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पाचोरा येथील विद्यार्थ्यांची दमदार बाजी

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पाचोरा येथील विद्यार्थ्यांची दमदार बाजी

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

June 19, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

June 19, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

June 19, 2026
‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम; ओपीडी पेपरवर ‘मोदी पर्वा’तील १२ ऐतिहासिक निर्णयांची माहिती
जळगाव जिल्हा

‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम; ओपीडी पेपरवर ‘मोदी पर्वा’तील १२ ऐतिहासिक निर्णयांची माहिती

June 19, 2026
पाचोऱ्यातील जबरी चोरीचा पोलिसांकडून छडा; २१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद
गुन्हे

पाचोऱ्यातील जबरी चोरीचा पोलिसांकडून छडा; २१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपी जेरबंद

June 19, 2026
जैन हिल्स येथे ‘फ्रूटफुल इंडिया’ प्रकल्पाची राष्ट्रीय संशोधन अनुदान नियोजन कार्यशाळा उत्साहात
कृषी

जैन हिल्स येथे ‘फ्रूटफुल इंडिया’ प्रकल्पाची राष्ट्रीय संशोधन अनुदान नियोजन कार्यशाळा उत्साहात

June 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group