पाचोरा, दि. १२- येथील पाचोरा तालुका तायक्वांदो व गणराज स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी तायक्वांदो स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्ण, रौप्य तसेच कास्य पदकांची कमाई केली. पनवेल येथे पोलीस मुख्यालय, नवी मुंबई व स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन तर्फे आयोजित ९ वी राज्यस्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा घेण्यात आली.
दरम्यान पाचोरा येथील खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे पाचोरा तालुक्याचे नाव उंचावले आहे. स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन व पोलीस मुख्यालय कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१० जुलै रोजी मुंबई पनवेल येथे नववी राज्यस्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. यात पाचोरा येथील ११ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तर जिल्ह्यातील २८ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
पाचोरा येथील सहभागी खेळाडू..
ऋतुजा पाटील (गोल्ड मेडल), नियती गंभीर (गोल्ड मेडल), ऋतिका खरे (गोल्ड मेडल), प्रवीण खरे (गोल्ड मेडल), साहिल बागुल (गोल्ड मेडल), जयदीप परदेसी (गोल्ड मेडल), अमित सुपलकर (सिल्वर मेडल), रूपल गुजर (सिल्वर मेडल), सुमित्रा सोमवंशी (सिल्वर मेडल), गुरुशरण सोमवंशी (सिल्वर मेडल), आयुष मोरे (ब्राँझ मेडल) इत्यादी सर्व विद्यार्थी खेळाडूंना क्रिडा प्रशिक्षक सुनील मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्या खेळाडूंचे रमेश मोर यांनी अभिनंदन केले.