• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे उद्घाटन; गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 22, 2026
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

जळगाव, प्रतिनिधी : प्रत्येकाच्या जीवनात भितीतून संघर्ष निर्माण होतो. या संघर्षातून चांगले कार्य कसे करता येईल यासाठी आपले नेतृत्व विकसीत झाले पाहिजे. उपदेशापेक्षा प्रत्यक्ष कार्यावर भर देऊन दुसऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल असे कार्य केले पाहिजे, त्यासाठी सत्याचा आधार असावा. प्रामाणिकता, दुरदर्शीपणासह सक्षम विचाराने निर्भय राहावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात परिवर्तन करताना आत्मविश्वास हवा. ‘आत्मविश्वासच जिंकतो तर त्याला कमकूवत करणारे आयुधे कधीच जिंकत नाही.’ असे प्रेरणादायी विचार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो यांनी व्यक्त केेले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आजपासून ते ३ ऑक्टोबर पर्यंत नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे आयोजन केले आहे. कॅम्पच्या उद्घानाप्रसंग दामोदर मावोजो बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. गिता धरमापाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई, डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन झाले.

नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पमध्ये नेपाळसह, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, झारखंड, हिमाचलप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडीसा, अरूणाचल प्रदेश, महाराष्ट्र या राज्यातील युवकांनी सहभाग घेतला आहे.

भवरलालजी जैन यांनी जल, जमिन, जंगल, जन, जानवर यांच्यावर विशेष प्रेम केले. या पाच तत्वांवर विश्वास ठेवला आणि ह्याच तत्वांनी त्यांचा आत्मविश्वास वाढविला. आणि जैन हिल्स येथे सुंदर वृक्षवल्लीसह नैसर्गिक संपदा वाढविली. सोबत महात्मा गांधीजींचा विचार युवकांपर्यंत पोहचविण्यारे जागतिक दर्जाचे गांधी तीर्थ साकार केले. महात्मा गांधीजींसोबत महादेवी वर्मा यांच्या जीवनातील एक प्रसंग नेतृत्व आणि देशसेवेची खरी दिशा सांगणारा आहे. बालवयात त्यांनी लिहिलेल्या कवितेला पुरस्कार म्हणून एक पदक मिळाले होते. त्याच काळात महात्मा गांधींची भेट झाल्यावर त्यांनी ते पदक गांधीजींना दाखवले. गांधीजींनी ते पदक देशाच्या कामी येईल असे सांगून स्वतःजवळ ठेवले.

नुकताच मिळालेला आपला पहिला पुरस्कार गेला म्हणून महादेवी वर्मा त्या वेळी काहीशा निराश झाल्या; मात्र नंतर त्यांना समजले की त्यांचा पुरस्कार वैयक्तिक अभिमानासाठी नव्हे, तर देशसेवेसाठी वापरला गेला आहे. वर्षांनंतर महादेवी वर्मा पुन्हा गांधीजींना भेटल्या. तोपर्यंत त्या देशातील नामवंत साहित्यिक झाल्या होत्या. त्यांनी बालपणीच्या त्या प्रसंगाची आठवण करून दिली. गांधीजींनी त्यांना सांगितले की, तुम्हाला मिळालेला तो पहिला पुरस्कार देशाच्या कामी आला, यापेक्षा मोठा पुरस्कार दुसरा कोणता असू शकतो? हा प्रसंग आजच्या तरुण नेतृत्वासाठीही महत्त्वाचा संदेश देतो. यश म्हणजे केवळ स्वतःसाठी मिळवलेली प्रसिद्धी किंवा सन्मान नव्हे; आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा आणि मिळालेल्या संधींचा उपयोग समाज आणि देशाच्या हितासाठी करणे, हाच खऱ्या यशाचा अर्थ आहे असे दामोदर मावजो यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

डॉ. सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, आपल्या कर्तृत्वाची खरी किंमत केवळ मिळालेल्या सन्मानात नसून त्याचा उपयोग समाजासाठी किती होतो, यात आहे. नेतृत्व म्हणजे केवळ स्वतः पुढे जाणे नव्हे, तर इतरांना सोबत घेऊन समाज आणि देशाला पुढे नेणे होय. ज्ञान, प्रतिभा, संधी आणि यश यांचा उपयोग व्यापक हितासाठी करण्याची वृत्ती तरुणांनी जोपासली पाहिजे. वैयक्तिक यशापेक्षा समाजासाठी केलेले योगदान मोठे असते आणि देशसेवेत आपल्या कर्तृत्वाचा वाटा उचलणे, हाच नेतृत्वाचा खरा अर्थ आहे

गांधी रिसर्च फाउंडेशन संशोधन आणि पारंपरिक ज्ञान समाजोपयोगी बनविण्याचे कार्य करते. जैन इरिगेशनच्या माध्यमातून उद्योग आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम याठिकाणी बघता येतो. या शिबिरात श्रमदान, योग, ध्यान, चर्चा, व्याख्याने, ग्रामभेटी, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांतून ‘Head, Heart and Hands’ म्हणजे विचार, भावना आणि कृती या तिन्ही स्तरांवर शिकण्याची संधी मिळणार आहे.

विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवादातून केवळ उत्तरे नव्हे, तर नवे प्रश्न विचारण्याची क्षमता विकसित करणे, अनुभव समाजापर्यंत पोहोचवणे, छोट्या कृतीतून परिवर्तनाची सुरुवात करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. गीता धरमपाल यांनी सांगितले.

दादा धर्माधिकारी यांच्या विचारानुसार समाजात दोन प्रकारचे ‘चोर’ असतात, दामचोर आणि कामचोर. दामचोर कमी मोबदल्यात अधिक काम करून घेतो, तर कामचोर अधिक मोबदला घेऊन कमी काम करतो. त्यामुळे या दोन्ही प्रवृत्तींपासून दूर राहून प्रामाणिकपणे मेहनत करावी, कष्टाची सवय लावावी आणि आपल्या श्रमातून उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी गांधीयन लिडरशिप कॅम्पमध्ये सहभागी युवा युवतींना केले.

डॉ. अश्विन झाला यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून सत्य अहिंसा ही वैश्वीकस्तरावर कार्य करते. यशस्वी व्यक्तींमध्ये संघर्ष ही सुवर्ण संधी असते. संघर्ष काळात महात्मा गांधीचे विचार महत्त्वाचे ठरतात त्यासाठी स्वत:चा शोध घेणे, समाजातील अनिष्ठ व्यवस्थेचा विरोध करत राहणे आणि नेतृत्व कौशल्य विकसीत करत राहणे व स्वत: इतरांसाठी प्रेरणादायी ठरणे हे नॅशनल लिडरशीप कॅम्पमधून संस्कारीत केले जाते.

शिबिराचा दैनंदिन कार्यक्रम व मार्गदर्शक
शिबिराचा दैनंदिन कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आहे. सकाळी ५.३० वाजता उठण्या पासून दिवसाची सुरुवात होईल. योग व ध्यान, दिवसाचा विचार, श्रम संस्कार, प्रार्थना व चरखा सूत कताई यांसारखे उपक्रम आहेत. दुपारी दुसऱ्या सत्रात सामुदायिक गीते, राज्य सादरीकरण, त्यानंतर गट चर्चा, शांतता खेळ व संध्याप्रार्थना यांचा समावेश आहे. संध्याकाळी चर्चा केली जाईल. विविध उपक्रमांमधून एकात्मता, शिस्त व शांततेचा संदेश शिबिरार्थींना दिला जातो. या शिबिरात तुषार गांधी, प्रो. अनिल गुप्ता, डॉ. सुदर्शन अयंगार, हसमुख पटेल, बरुन मित्रा, कल्याण अक्किपेड्डी आणि जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

दीपक मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले तर अभिषेक वैष्णव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.


 

Next Post
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

ताज्या बातम्या

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add