• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 22, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

जळगाव, प्रतिनिधी : बाल रंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा व कान्हा ललित कला केंद्र, जळगाव आयोजित “जल्लोष लोककलेचा” या कार्यक्रमात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल यांनी विविध कलाप्रकारात उत्कृष्ट कामिगीरी करीत घवघवीत यश संपादन केले. या यशातून अनुभूती स्कूलच्या संघ, तसेच एकल प्रकारात दोन विद्यार्थी लातूरला होऊ घातलेल्या राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

समूह लोकनृत्य प्रथम एकल लोकवादन प्रथम यशोदीप थोरात, एकल लोकगीत प्रथम आराध्य खैरनार यांचीसुद्धा निवड झाली आहे. ह्यांच्यासोबत अनुभूतीच्या तनुश्री दांडगे हिने एकल लोकनृत्य कलाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन व शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्यासह सर्व शिक्षकवृंदांनी विशेष कौतूक केले आहे.

या यशासाठी शाळेचे नृत्यशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व संगीत शिक्षक भूषण खैरनार यांच्या सह सर्व शिक्षकवृदांनी विशेष परिश्रम घेतले.

जल्लोष लोककलेच्या या स्पर्धेत समूह लोकनृत्यासाठी २३ संघ, एकल लोकगीतासाठी ८ स्पर्धक, एकल लोकवादनासाठी ८ स्पर्धक, समूह लोकगीतासाठी ६ संघ तर एकल लोकनृत्यासाठी २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अनुभूती स्कूलने दैदिप्यमान यश संपादन केले. समूह लोकनृत्य, एकल लोकवादन आणि एकल लोकगीतमध्ये सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक, समूह लोकगीत आणि एकल लोकनृत्यात उत्कृष्ट द्वितीय पारितोषिके प्राप्त केली आहेत.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दिपमाला काळे, डॉ. केतकी पाटील, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी, उद्योजक रजनिकांत कोठारी उपस्थित होते. तर पारितोषिक वितरण समारंभासाठी पीपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, एम. जे. कॉलेजचे संचालक शशिकांत वडोदकर, बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, उपाध्यक्ष नेहा पवार-गुजंराठी उपस्थित होते.

पारितोषिकाचे स्वरूप :

१. समूह लोकनृत्य (प्रथम) – रोख ३०००/- रुपये, चषक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

२. एकल लोकवादन (प्रथम) – रोख १०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

३. एकल लोकगीत (प्रथम) – रोख १०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

४. समूह लोकगीत (द्वितीय) – रोख २०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

५. एकल लोकनृत्य (द्वितीय) – रोख ७००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

Next Post
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

ताज्या बातम्या

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add