• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

१७१ खेळाडूंचा सहभाग; विविध वयोगटांत चुरशीच्या लढती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 17, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

जळगाव,  प्रतिनिधी : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव प्रायोजित ‘जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६’ स्पर्धा ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडली. जळगावचे वरिष्ठ खेळाडू स्व. अविनाश दामले यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती.

९, ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या एकेरी व दुहेरीसह खुल्या गटातील पुरुष व महिला एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी तसेच ३५ वर्षांवरील गटातील सामने घेण्यात आले. जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांतील १७१ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेते व उपविजेत्या खेळाडूंना जैन इरिगेशनतर्फे आकर्षक चषक, सुवर्ण व रजत पदक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

बक्षीस वितरणप्रसंगी जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी, राष्ट्रीय खेळाडू ब्रिजेश गौर, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, अमोल दामले, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे आणि प्रशिक्षिका दीपिका ठाकूर उपस्थित होते. ९ वर्षांखालील मुली एकेरीत गाथा देशमुख विजेती, तर अनन्या माहेश्वरी उपविजेती ठरली. ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अनय पाटील, तर मुलींच्या एकेरीत सुमिती ठाकूर विजेते ठरले.

१३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत दर्शील मुनोत, मुलींच्या एकेरीत आरोही माहेश्वरी यांनी विजेतेपद मिळविले. १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अनामय जोशी, तर मुलींच्या एकेरीत पलक महाजन विजेत्या ठरल्या. १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत नैतिक शिंदे, तर मुलींच्या एकेरीत ओवी पाटील विजेते ठरले.

१९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत फाल्गुन पाटील, तर मुलींच्या एकेरीत पूनम ठाकूर यांनी बाजी मारली. खुल्या पुरुष एकेरीत तेजम केशव, तर महिला एकेरीत राजश्री पाटील विजेते ठरले. पुरुष दुहेरीत प्रणव पाटील–शुभम पाटील, महिला दुहेरीत गीता पंडित–रीत नाथानी, तर मिश्र दुहेरीत राजश्री पाटील–उमेर देशपांडे यांनी विजेतेपद पटकावले. ३५ वर्षांवरील पुरुष एकेरीत चेतन वराडे, तर पुरुष दुहेरीत अतुल ठाकूर–चेतन वराडे विजेते ठरले. मिश्र दुहेरीत वृषाली धांडे–किर्ती मुनोत यांनी विजेतेपद मिळविले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे कौतूक केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य पंच दीपिका ठाकूर यांच्यासह सुफयान शेख, पूनम ठाकूर, अर्श शेख, फाल्गुन पाटील, तेजल भालेराव, वैष्णवी बोंडे, राखी ठाकूर व तेजम केशव यांनी पंच म्हणून काम पाहिले. विनीत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. किशोर सिंह यांनी आभार मानले.


 

Next Post
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

ताज्या बातम्या

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई
राजकीय

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
पारोळ्यात महिलेचे दागिने लांबवणारा सराईत चोरटा बीडमधून गजाआड!
गुन्हे

पारोळ्यात महिलेचे दागिने लांबवणारा सराईत चोरटा बीडमधून गजाआड!

November 3, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत छाननीचा धक्का ; संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज बाद
खान्देश

जिल्हा बँक निवडणुकीत छाननीचा धक्का ; संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज बाद

November 3, 2026
वॉर्ड १५ मधील स्वच्छतेच्या प्रश्नांवर महापौरांचे तातडीने कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

वॉर्ड १५ मधील स्वच्छतेच्या प्रश्नांवर महापौरांचे तातडीने कारवाईचे आदेश

November 3, 2026
महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर

November 2, 2026
वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर
गुन्हे

वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर

November 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add