• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

महापौर दीपमाला काळे यांचा वॉर्ड क्रमांक १७ येथे दौरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 3, 2026
in राजकीय, सामाजिक
0
अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेच्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ अंतर्गत मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) महापौर दीपमाला काळे यांनी वॉर्ड क्रमांक १७ मधील विविध भागांना भेट देऊन पाहणी केली.

या वेळी स्थानिक नगरसेवक इब्राहिम पटेल, अक्षय वंजारी, जरीना शब्बीर शाह, हीनाबी शाकीरखान, माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे तसेच पाणीपुरवठा, विद्युत व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिराजवळ पाहणी करताना, तेथील जुन्या मुत्रालयामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने ते तातडीने काढून टाकण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

तसेच त्या मोकळ्या जागेवर नागरिकांना बसण्यासाठी बाकडे टाकण्यास सांगितले व परिसरातील गटारी स्वच्छ करण्याचे निर्देश दिले.एमआयडीसी रस्त्यावरील जुन्या बुरुजसमोर महानगरपालिकेच्या जागेवर गाई-म्हशींचे गोठे उभारल्याचे आणि अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित व्यक्तींना चांगलेच धारेवर धरले. तसेच तिथे पसरवलेल्या अस्वच्छतेबद्दल त्यांना जागीच दंड ठोठावण्यात आला आणि ती ओपन स्पेस तात्काळ मोकळी करून घेण्याचे आदेश दिले.

लक्ष्मी नगरमधील गटारी नाला साफ करून तिथे कल्वर्ट टाकून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. या भागातून जाणाऱ्या मोठ्या नाल्याबाबत नागरिकांच्या यापूर्वीच तक्रारी असूनही कारवाई न झाल्याने, महापौरांनी संताप व्यक्त करत तात्काळ नाला साफ करून कल्वर्ट टाकण्याचे आदेश दिले.दत्तनगर परिसरामध्ये प्रलंबित असलेली गटारींची कामे पूर्ण करून ओव्हरफ्लो होणाऱ्या सर्व गटारी तातडीने साफ करून घेण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. या अभियानामुळे नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


 

Next Post
‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!

‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू
खान्देश

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक
जळगाव जिल्हा

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

November 4, 2026
पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश
खान्देश

पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना खडे बोल, पथदिवे तातडीने सुधारण्याचे निर्देश

November 4, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!
क्रिडा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

November 4, 2026
गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद
जळगाव जिल्हा

गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद

November 4, 2026
एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनच्या नावनोंदणीला सुरुवात
जळगाव जिल्हा

एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉनच्या नावनोंदणीला सुरुवात

November 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add