• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळ तालुक्यात अवैध दारूविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; १० गुन्हे दाखल

२६५ लिटर गावठी दारू व २,८०० लिटर रसायन जप्त; १ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 29, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळ तालुक्यात अवैध दारूविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; १० गुन्हे दाखल

जळगाव, प्रतिनिधी : भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले असून, २६५ लिटर गावठी दारू आणि २ हजार ८०० लिटर रसायनासह एकूण १ लाख ६६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी मार्गदर्शन केले.

या विशेष मोहिमेंतर्गत दिपनगर दुरक्षेत्र, कु-हा दुरक्षेत्र, साकेगाव बीट आणि किन्ही परिसरात छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १० स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.दिपनगर दुरक्षेत्रात पिंप्रीसेकम येथील अशोक धनसिंग तायडे (वय ५१) आणि फेकरी येथील वाल्मीकनगरातील रितेश प्रकाश सूर्यवंशी (वय २८) यांच्याविरुद्ध प्रत्येकी २० लिटर गावठी दारूसंदर्भात कारवाई करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कु-हा दुरक्षेत्रात बेलव्हाय येथील निवृत्ती दगडू सोनवणे (वय ४५) याच्याकडून ३० लिटर, तर वराडसीम येथील विलास गोविंदा सपकाळे (वय ५८) याच्याकडून १५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणांत अनुक्रमे ३ हजार आणि १ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

साकेगाव बीटमध्ये सागर मधुकर सोनवणे (वय ३०), भगवान भीमराव कोळी (वय ३८) आणि केशव माधव मराठे (वय ५०, सर्व रा. साकेगाव, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या तिन्ही प्रकरणांत प्रत्येकी ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. प्रत्येक प्रकरणातील मुद्देमालाची किंमत ३ हजार रुपये आहे.

किन्ही परिसरातील कारवाईत कन्हाळा येथील उस्मान हसन गवळी (वय ४९), खलील हसन गवळी (वय ३९) आणि युनुस हसन गवळी (वय ४३) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत अनुक्रमे ८००, १ हजार ६०० आणि ४०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. या तिन्ही प्रकरणांत अनुक्रमे ४३ हजार, ८३ हजार आणि २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जिल्ह्यात कुठेही अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक सुरू असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत वाल्मिक सोनवणे, सुभान तडवी, विकास बाविस्कर, सुधीर विसपुते, ईस्तीयाक शेख, हेमंत मिटकर, रशीद तडवी, सुभाष सोनवणे, सचिन पारधी, न्यायाजोद्दीन तडवी, किरण तायडे, जगदीश भोई आणि लीना लोखंडे यांचा सहभाग होता.


 

Next Post
मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

ताज्या बातम्या

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन
जळगाव जिल्हा

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

October 30, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
Uncategorized

अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

October 30, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

नशिराबादजवळ डंपर व ट्रकची भीषण धडक; ट्रकचालकाचा मृत्यू, महामार्ग तीन तास ठप्प

October 30, 2026
कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!
खान्देश

कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!

October 30, 2026
‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ प्रभाग १२ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी
जळगाव जिल्हा

‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ प्रभाग १२ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी

October 30, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या
जळगाव जिल्हा

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या

October 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add